Marathwada news esakal
मराठवाडा

Marathwada : रात्रीच्या वीज पुरवठ्याने वैतागले शेतकरी जीवाला धोका ,दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी

शेतकऱ्यांकडून सध्या पिकांना पाणी देण्याची लगबग सुरू आहे

सकाळ डिजिटल टीम

बुलडाणा : शेतकऱ्यांकडून सध्या पिकांना पाणी देण्याची लगबग सुरू आहे. शेतीला दिवसा वीजपुरवठा केला जात नसल्याने शेतकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी जागरण करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे दिवसभर राबराब राबायचे अन् रात्री शेतात पाणी देण्यासाठी जागायचे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महावितरणकडून होणाऱ्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदा जिल्ह्यात कांदा, सोयाबीन, भाजीपाला, ऊस, ज्वारी, मका, तूर यासह अन्य शेतीपिके आहेत.या शेतपिकांना जगविण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस धडपड करीत आहेत. चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकरी काबाडकष्ट करीत आहेत. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी महावितरणकडून दिल्या जाणाऱ्या वेळेनुसारच नियोजन करावे लागत आहे.

रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या येथील एका शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना (ता.१२) रोजी सकाळी उघडकीस आली. योगेश डिगांबर टाले (वय ३०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. परिसरातील रब्बीच्या हंगामात रात्री ९ ते सकाळी ६ या वेळात रात्रीचा विज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अंधाऱ्या रात्री पिकांला पाणी देण्यासाठी जावे लागते. ता.१० चे रात्री गावातील योगेश टाले(वय ३०) हे काळेपाणी शिवारातील शेतात हरबरा पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता.

रात्री अचानक विज पुरवठा खंडित झाल्यानंतर प्रदिर्घ काळ विज पुरवठा सुरू झाला नाही. विजेच्या प्रतिक्षेत अचानक झोपेची डुलकी लागली. अशातच ते विहीरीत पडले. दिवसभर शोध घेतल्यानंतर (ता.११) रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना त्यांच्या भावाला दिसले.साखरखेर्डा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली असता, (ता.१२) रोजी सकाळी योगेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

आठ तास वीजपुरवठा, तोही रात्रीच

जिल्ह्यात शेतकऱ्यांना २४ तासांपैकी फक्त ८ तासच वीजपुरवठा करण्यात येतो. प्रत्येक उपकेंद्रांतर्गत गावनिहाय वेगवेगळ्या वेळेचे नियोजन महिन्याच्या सुरुवातीला ठरविले जाते. यासंदर्भातील माहिती शेतकऱ्यांना सोशल मीडियाच्या आधारे दिली जाते. त्यानुसार शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी नियोजन आखतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT