ganesh visarjan sakal
मराठवाडा

माजलगाव : होडीतुन होतेय गणेश विसर्जन

भोई बांधवांचा स्तुत्य उपक्रम, गणेशमुर्तींची विटंबना न होण्यास मदत

कमलेश जाब्रस

माजलगाव (जि.बीड) : माजलगाव धरणातुन सिंदफणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलेले आहे तर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. आज अनंत चतुर्दशी असुन श्री गणेश विसर्जनासाठी सिंदफणा नदीपात्रात येणा-या भाविकांकरीता होडीतुन गणेश विसर्जन होत असुन यासाठी भोई बांधवांनी पुढाकार घेत खोल पाण्यात गणेशमुर्ती विसर्जन होत असल्याने नदीपात्रातील पाणी कमी झाल्यास होणारी मुर्तींची विटंबना थांबण्यास मदत होणार आहे.

यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे सिंदफणा नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लहान आकारातील गणेश मुर्तींना परवानगी दिली आहे. याचे काटेकोरपणे गणेश मंडळांनी पालन केले. आज रविवारी अनंत चतुर्दशी सकाळपासुनच घरगुती व गणेश मंडळांच्या गणपती विसर्जनाची लगबग सुरू होती. सिंदफणा नदीपात्र परिसर पालिका प्रशासनाने पुढाकार घेत स्वच्छ केला असुन याठिकाणी निर्माल्य, फुले, हार आदी पुजेचे साहित्य नदीपात्रात न टाकता ट्ॅक्टरमध्ये टाकण्याची सुविधा करण्यात आली.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन स्थळी गर्दी होउ नये याकरीता देखिल पालिकेच्या वतीनेछोटे टम - टम, अॅपे शहरातील सर्वच प्रभागात उपलब्ध करून दिले असल्याने भाविकांना नदीपात्राजवळ गर्दी करण्याची आवश्यकता राहिली नाही तर सिंदफणा नदीपात्रात भोई बांधव सकाळपासुनच होडी घेउन थांबले आहेत. या नदीपात्राच्या अलिकडच्या तिरावर भाविकांनी विधीवत पुजा केल्यानंतर या गणेशमुर्ती होडीतुन खोल पाण्यात नेउन विसर्जीत केल्या जात आहेत. पाणी कमी झाल्यानंतर कमी पाण्यात टाकलेल्या गणेशमुर्तींची विटंबना होण्याची शक्यता असते. यावर भोई बांधव सचिन घेणे, कृष्णा घेणे, शैलेश घेणे, दशरथ घेणे, अमित घेणे यांनी लढविलेल्या या शक्कलीमुळे खोल पाण्यात मुर्ती विसर्जन होत आहे. याठिकाणी पालिका कर्मचारी, पोलिस बंदोबस्त, अग्निशामक दलाचा बंब अशी व्यवस्था विसर्जन स्थळी तैनात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT