Isapur dam 50% water storage 
मराठवाडा

हिंगोली : इसापूर धरणात ५० टक्के पाणीसाठा

पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा

संजय कापसे

कळमनुरी : गतवर्षी पूर्ण क्षमतेने भरलेल्या इसापूर धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यामधून रब्बी व उन्हाळी हंगामाकरिता एकूण सात पाणी पाळ्याच्या माध्यमातून ३७३.८९ दलघमी पाणी सोडण्यात आले. त्यानंतर सद्यःस्थितीत धरणात ५०.७३७१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्यास पुढील काळात त्याचा मोठा उपयोग विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

मागील वर्षी इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणामधील पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. इसापूर धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यामधून रब्बी उन्हाळी सिंचन व पिण्याकरिता डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात तीन पाणी पाळ्या सोडण्यात आल्या तर मार्च एप्रिल मे जून या काळात एकूण चार पाणी पाळ्या सोडण्यात आल्या. शेवटची पाणी पाळी पाच जूनपर्यंत सोडण्यात आली. या एकूण सात पाणी पाळ्याच्या माध्यमातून धरणामधून ३३७.८९ दलघमी पाणी सिंचन व पिण्यासाठी सोडवण्यात आले.

मागील वर्षी ९ जूनला धरणाची पाणी पातळी ४३४.४७ मीटर इतकी होती तर उपयुक्त पाणीसाठा ४१४.८५ दलघमी एवढा होता. या पाण्याची टक्केवारी ४३ टक्के इतकी होती. त्या तुलनेत १५ जून २०२२ ला धरणाची पाणी पातळी ४३५.१३ मीटर होती. उपयुक्त पाणीसाठा ४५८. २० दलघमी तर टक्केवारी ४७.५२ एवढी होती.

गतवर्षीपेक्षा कमी पाऊस

गतवर्षी धरण क्षेत्रात १८४ मिलिमीटर पाऊस झाला होता. आजघडीला १५९ मिलिमीटर पावसाची नोंद पाणलोट क्षेत्रात घेण्यात आली आहे. सद्यःस्थितीत इसापूर धरणाची पाणी पातळी ४३५.५८० मीटर आहे. उपयुक्त पाणीसाठा ४८९.१५५९ दलघमी एवढा आहे. या पाण्याची टक्केवारी ५०.७३७१ एवढी आहे. एकंदरीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT