jalna sakal
मराठवाडा

Jalna : मराठा समाजाच्या वतीने बाजार गेवराईत केंद्र, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींची प्रतीकात्मक अंत्ययात्रा आणि अंत्यविधीही

मराठा आरक्षणाच्या निर्णयाबद्दल राज्य शासनाला ४० दिवसांची मुदत देण्यात आली होती

आनंद इंदानी

बदनापूर - राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. त्यात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी पाच दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी बदनापूर तालुक्यातील मराठा समाज बांधव विविधांगी आंदोलने करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बाजार गेवराई (ता. बदनापूर) येथे संतप्त मराठा बांधवांनी केंद्र व राज्य सरकार तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची वाजत - गाजत, नेत्यांच्या नावाने बोंबाबोंब करीत गावातून प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली शिवाय थेट स्मशानभूमीत प्रतीकात्मक अंत्यविधी देखील केला.

मराठा आरक्षणाच्या निर्णयाबद्दल राज्य शासनाला ४० दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र शासनाने आरक्षणाचा प्रश्न न सोडविल्याने मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत असल्याने सरकार विरुद्ध मराठा समाज बांधव संतप्त झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून बाजार गेवराई येथील सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फोटोंची प्रतिकात्मक तिरडी बांधण्यात आली.

शिवाय एकाने पुढे मडके हातात धरून या तिरडीची वाजत - गाजत, नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत गावभर प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी "एक मराठा - लाख मराठा", "आरक्षण आमच्या हक्काचे" अशा घोषणा देण्यात आल्या.

ही प्रतीकात्मक अंत्ययात्रा गावबाहेर स्मशानभूमीत पोचल्यानंतर तिरडीला लावण्यात आलेल्या नेत्यांच्या फोटोचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. यावेळी मराठा समाज बांधवांनी आपल्या भाषणात सरकारच्या आरक्षण विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवला. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावर तालुक्यातील मराठा समाज संतप्त झाला आहे. त्याचे पडसाद गावागावात आंदोलनाच्या रूपाने दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT