Marathwada news esakal
मराठवाडा

Marathwada : महाडीबीटी पोर्टल हॅंग, कागदपत्रे अपलोड होईनात

शेतकरी हैराण : पोर्टल सुरू न झाल्‍यास लाभापासून वंचित राहणार

सकाळ डिजिटल टीम

सिल्लोड : शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारेच अर्ज करावा लागतो. परंतु हे पोर्टल मागील अनेक दिवसांपासून हॅंग झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ घेण्यास अपलोड करावी लागणारे कागदपत्रे ऑनलाइन अपलोडच होत नाही. त्यामुळे शेतकरी चांगलेच चिंतातूर झाले आहे. त्यातच ऑनलाइन अर्ज भरला गेला तरच योजनांचा लाभ मिळतो. त्यामुळे कागदपत्रेच अपलोड होत नसल्याने शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.

शासकीय योजनचा लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी व त्यात सुसूत्रता आणण्याकरिता ऑनलाइन कागदपत्रे दाखल करण्याचा पर्याय सहज व सोपा असला तरी, आज महाडीबीटी पोर्टल वारंवार हॅंग होत आहे. त्यामुळे हा पर्यायच शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ऑनलाईन सोडतीद्वारे शेतकऱ्यांची निवड करण्यात येते. अर्ज केल्यानंतर सोडतीमध्ये निवड झाल्यानंतर पुन्हा अर्जासाठी वापरलेल्या कागदपत्रांचा याच साईटवरून कागदपत्रे सात दिवसात दाखल करण्याचा मॅसेज शेतकऱ्यांना पाठविण्यात येतो.

त्यासाठी सात दिवसातच शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करावी लागतात. त्यामुळे या लाभधारक शेतकऱ्यांना खाजगी कॉम्प्युटर केंद्रांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. त्यातच मोबाईलवर आलेला ओटीपी दिल्यानंतर सर्व्हरला अडचण येत असल्याने कागदपत्रे अपलोड होत नाही. त्यामुळे कृषि विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईनचा घाट मात्र डोकेदुखी ठरू लागला आहे. मोबाइलवरून सर्व गोष्टी शेतकऱ्यांना करता येतात, अशी चर्चा कृषी विभागाच्या वतीने करण्यात येते. परंतु सर्वच शेतकरी अशा पद्धतीने कामे करू शकत नाही हे देखील वास्तव आहे.

दुकानदारांची दुकानदारी

ग्रामीण भागात कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषि विभाग व लाभार्थी यापेक्षा कृषि साहित्याची दुकाने, खाजगी कॉम्प्युटरची केंद्रे यांचीच दुकानदारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. योजनेचे फलित शेतकऱ्यांना समृद्ध करणे, असे असताना शेतकरी मात्र ऑनलाइन कागदपत्रांच्या विळख्यात सापडत आहे.

मागील महिनाभरापासून महाडीबीटीचे पोर्टलच हॅंग होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरताना व कागदपत्रे अपलोड करण्यास अडचणी येत आहे. यासंबंधी वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. लवकरच यावर मार्ग निघेल.

-सुभाष आघाव, उपविभागीय कृषी अधिकारी, सिल्लोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT