farmer 
मराठवाडा

रानं उजाड, पाझर तलाव आटली; पुढील सात-आठ महिने कसे काढायचे? शेतकऱ्यांसमोर प्रश्न

विवेक पोतदार

जळकोट, (जि.लातूर): तालुक्यात खरिपातील सर्व पिके निघाली असून राने उजाड झाली आहेत. काही शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी करणेही सुरु असून उन्हाळ्यापूर्वीच पाझर तलावही आटू लागले असून जनावरांच्या पाण्यासाठी भटकंती सुरु असल्याने सात-आठ महिने कसे काढायचे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

खरीपातील तूर निघाल्यानंतर शिवारात सर्व राने उजाड होत आहेत. तुरीचे अत्यल्प उत्पन्न निघाले असून खर्चही निघाला नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शिवारात उन्हाळी रानाच्या मशागतीला सुरवात झाली आहे. शिवारातील राने उजाड झाली असून मजूर भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी शहराकडे जात आहेत.

ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी
उजाड झालेल्या शिवारात अनेक शेतकरी रानाच्या मशागत कामाला लागले आहेत. ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी करण्याच्या कामाला लागले आहेत. नांगरटी केल्यानंतर उन्हाने रान तळून पेरणीयोग्य होते म्हणून या कामाला अनेकजण लागले असल्याचे चित्र आहे.

सात-आठ महिने कसे काढणार?
येणारे पावसाळ्यापर्यंतचे सात- आठ महिने कसे काढायचे हा प्रश्न शेतकर्यासमोर आ वासून उभा आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा  प्रश्न आहे. पाझर तलाव आटल्याने शिवारात मुबलक पाणी नसल्याने  पिण्याच्या पाण्यासाठी कोसो दूर भटकंती सुरु असल्याचे चित्र असून एप्रिल मे महिन्यात हा प्रश्न अधिक गंभीर बनणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

राने उजाड
जनावरांना उजाड रानावरील पालापाचोळा खाऊ घालत दिवस ढकलण्याचे काम शेतकरी करत असल्याचे चित्र आहे. तर भाकड जनावरांना कवडीमोल किमतीत बाजारात नेऊन विकावे लागत आहे. बैलबाजारात जनावरांचे भाव कमी झाल्याचे पशुपालक सांगत आहेत. पाऊस वेळेवर आला तरी नवा चारा येण्यासाठी जुलै-आॅगष्ट महिन्याची वाट पहावी लागणार असल्याने येणारे महिने कसे काढायचे? हा प्रश्न आहे.सद्यस्थितीत उन्हाळ्यापूर्वीच पाझर तलाव आटत असून विहिरींही तळ गाठत आहेत.  जनावरांचे चारा-पाणी करत संगोपन करत रानाच्या मशागतीची धडपड करताना शेतकरी दिसत आहेत.

(edited by- pramod sarawale)

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT