marathwada news  esakal
मराठवाडा

Marathwada: रेल रस्त्याची दुर्दशा; नागरिक हैराण

वाहनधारकांना रस्त्याअभावी मारावा लागतो सहा किलोमीटर फेरा

सकाळ वृत्तसेवा

कन्नड : कन्नड व रेल गावाच्या मधून सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग गेला. मात्र, या रस्त्यापर्यंत रेल, नावडी, मुंडवाडी या परिसरातील ग्रामस्थ पोहचू शकत नाही. एवढी रेल-नावडी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या सात किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे.

वाहनधारकांना रस्त्याअभावी सहा किलोमीटर फेरा मारावा लागत आहे. त्यामुळे रेल ते नावडी या रस्त्यावर मकरणपूर, मुंडवाडी, मुंडवाडी तांडा आदी गावांच्या नागरिकांचे दळण वळण आहे. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.

दीड किलोमीटर अंतर पार पाडण्यासाठी नागरिकांचे मणके खिळखिळे होतात. त्यामुळे दुसऱ्या गावाकडून अंधानेर फाट्यावरून सहा किलोमीटरचा फेरा मारून येणे जाणे करावे लागते. कन्नड चाळीसगाव महामार्गावरील अंधानेर फाट्यावरून सहा किलोमीटर फेरा मारावा लागत असल्याने जास्त वेळ व इंधन खर्च होत आहे.

या गावात शेतीला पूरक उद्योग म्हणून मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करण्यात येतो. रस्त्या अभावी शाळकरी मुले, रूग्ण यांचे अतोनात हाल होत आहेत. अनेकांना मणक्याचे आजार जडले आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण २००७ ला पंतप्रधान सडक योजनेतून झाले होते‌.

त्यानंतर या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. या रस्त्यावर खापरी नदी आहे. या नदीवर मकरणपूर येथे पूल करण्यात आला आहे. या पुलाची उंची कमी झाली आहे. पावसाळ्यात नदीला पूर येऊन रेल, नावडी या गावांचा कन्नड शहराशी संपर्क तुटतो. शेतकऱ्यांना आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत व बाजारपेठेत नेता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानव-वन्यजीव संघर्ष वाढला! वाघ-बिबट्या हल्ले ‘राज्य आपत्ती’ घोषित; पीडितांना मिळणार सरकारी नोकरी, सरकारचा क्रांतिकारी निर्णय

Natural Farming Courses: नैसर्गिक शेती शिक्षणात मोठा बदल! ICARचे निर्देश, देशभरात लवकरच सुरू होतील UG–PG आणि PhD अभ्यासक्रम

Corona Remedies IPO : पहिल्या दिवशी 67%, दुसऱ्या दिवशी 500% सबस्क्रिप्शन! तर GMP 28% पर्यंत; हा IPO घ्यावा की नाही?

काय सांगता! 'धुरंधर'च्या सेटवर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जायचा अक्षय खन्ना; पण का? हे होतं कारण

ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा होणार बंद; 'या' तारखेपर्यंत दिली मुदत, राज्यात ८० लाख महिलांनी केलेली नाही e-KYC

SCROLL FOR NEXT