beed
beed beed
मराठवाडा

Rain Updates: मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात मॉन्सूनपूर्वीच (heavy rain in marathwada) पावसाळी वातावरण तयार झाले. काही जिल्ह्यांमध्ये शनिवारी (ता. पाच) तिसऱ्या दिवशीही पाऊस झाला. दरम्यान, बीड जिल्ह्यात रेणा नदीला पूर आला होता. त्यामुळे शेतकरी सुखावले असून, खरीप पेरणीच्या तयारीला वेग आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. करमाड परिसरात सायंकाळी सहानंतर १५ मिनिटे जोरदार पाऊस झाला. शिवाय इतरही काही भागात पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद (Osmanabad rain updates) जिल्ह्यात उस्मानाबाद, भूम, परंडा, कळंब शहर परिसरात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग व इटकळ परिसरामध्येही चांगला पाऊस झाला. उस्मानाबाद शहरामध्ये झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी वाहत होते, तर अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने नालीतील पाणी रस्त्यावर आले.


बीड जिल्ह्यातील घाटनांदूर परिसरात चौथ्या दिवशीही पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शिवारातील व परिसरातील शेततळे, लहान बंधारे ओव्हरफ्लो झाले. अंबाजोगाई शिवारात पहाटे पाचच्या सुमारास झालेल्या पावसामुळे रेणा नदीला पूर आला. यामुळे अंबाजोगाई व बर्दापूरकडे ये-जा करणारी वाहतूक सकाळी अकरा वाजेपर्यंत बंद होती.


हिंगोली जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ ते दहा यावेळी रिमझिम पाऊस झाला. तोपर्यंत सूर्यदर्शन झाले नव्हते. त्यानंतर मात्र दिवसभर कडक ऊन पडले होते. जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत तालुक्यांतील काही गावांत जोरदार पाऊस झाला. शनिवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. आठ वाजता पावसाची रिमझिम सुरू झाली ती दहा वाजेपर्यंत कायम होती. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर झाला. दहानंतर जिल्ह्यात कडक ऊन पडले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ते कायम होते. या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे.

परभणी जिल्ह्यात २४ तासांत ९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात परभणी तालुका ६.५, गंगाखेड १६.१, पाथरी २९.०, जिंतूर २.७, पूर्णा ३८.३, पालम २१.१, सेलू ९.५, सोनपेठ २२.६, मानवत १४. २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा जिल्ह्यात आतापर्यंत पडणाऱ्या पावसाच्या सरासरी पेक्षा १६.३ मिलिमीटरने जास्त आहे. दरम्यान, मुसळधार पावसाने खेर्डा शिवारातील शेतकरी शिवकन्या अशोक आम्ले यांच्या शेतातील विहीर ढासळली. जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात पाऊस झाला. इतर ठिकाणी ऊन-सावलीचा खेळ होता.

नांदेड शहरात हलका पाऊस
नांदेड जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दरम्यान, शहरात हलक्या सरी कोसळल्या. लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असले तरी पाऊस झाला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाषणाची सुरुवात नेहरुंच्या नावाने केली अन् मोदी तिसऱ्यांचा पंतप्रधान झाल्याचं राज ठाकरेंनी केलं जाहीर

गौतम अदानींनी तिच्यासाठी केला मदतीचा हात पुढे; जाणून घ्या काय आहे 'लवली'ची व्यथा!

Swati Maliwal: स्वाती मालिवाल भाजपच्या षडयंत्राचा भाग; 'आप'कडून घणाघाती आरोप

Mumbai Rally: पुतिन जसं विरोधकांना संपवतात, तसाच प्रयत्न मोदींकडून सुरु; अरविंद केजरीवाल यांचा घणाघात

Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!

SCROLL FOR NEXT