4thief_13.jpg sakal
मराठवाडा

हिंगोली : ट्रक चालकाला पाण्याच्या बाटलीत गुंगीचे औषध देऊन लुटले

गुंगीचे औषध देऊन रोख रकमेसह एक लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी शिवारात देवळाण ता.कन्नड येथील एका ट्रक चालकाला पाण्याच्या बाटलीमध्ये गुंगीचे औषध देऊन रोख रकमेसह एक लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात रविवारी ता. ३१ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कन्नड तालुक्यातील देवळाण येथील स्वप्नील सुराशे हे त्यांच्या ट्रकमध्ये आईसक्रीमचे साहित्य घेऊन औरंगाबादकडून नांदेडला निघाले होते . शुक्रवारी ता. २६ परभणी येथे एक व्यक्ती त्यांना भेटला. त्याने आपणास नांदेडला जायचे आहे असे सांगितले. त्यावरून सुराशे यांनी त्यास ट्रकमध्ये सोबत घेतले. मात्र ट्रक काही अंतरावर आल्यानंतर त्या व्यक्तीने सुराशे यांना पाण्याच्या बाटलीत गुंगीचे औषध दिले.

त्यामुळे त्यांना गुंगी येत असल्याने त्यांनी ट्रक औंढा ते वसमत मार्गावर नागेशवाडी शिवारात थांबविला सुरोशे बेशुध्द झाल्यानंतर संबंधित व्यक्तीने त्यांच्या जवळील ९५ हजार ७८५ रुपये रोख व एक सहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल घेऊन पोबारा केला . दरम्यान , सदर ट्रकला जीपीएस यंत्रणा असल्याने हा ट्रक एकाच जागेवर कसा काय उभा आहे याची शंका आईसस्क्रीम साहित्य पुरवठादाराला आली. त्यामुळे त्यांनी वसमत येथील एका विक्रेत्याला पाठवून खात्री केली असता ट्रक चालक सुराशे हे बेशुध्द असल्याचे दिसून आले.

त्यांना उपचारासाठी जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र ते शुध्दीवर येत नसल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले दरम्यान , रविवारी ते शुध्दीवर आल्याने त्यांनी सविस्तर प्रकार आईसस्क्रीम साहित्य पुरवठादारास सांगितला . त्यानंतर या प्रकरणात हट्टा पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल केला आहे . सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार , जमादार भुजंग कोकरे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT