Farmer agitation for water in marathwada sakal
मराठवाडा

Water Issue : मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटला; धरणात जलसमाधीसाठी जात असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले

मराठवाड्यातील पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता असून वैजापूर येथील पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या १०२ गावातील शेतकऱ्यांनी शनिवारी जलसमाधीचा इशारा दिला होता.

भानुदास धामणे

वैजापूर - मराठवाड्यातील पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता असून वैजापूर येथील पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या १०२ गावातील शेतकऱ्यांनी शनिवारी जलसमाधीचा इशारा दिला होता. जलसमाधी घेण्यासाठी निघालेल्या शेकडो शेतकऱ्यांना पोलिसांनी गवंडगाव येथील टोलनाक्यावर अडवले. यानंतर काही काळासाठी परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. या सर्व शेतकऱ्यांना येवला तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

नगर आणि निफाड तालुक्यातील गावासाठी नाशिक जिल्ह्यातील दारणा, भावली, मुकणे आणि भाम धरणातून नांदूर मधमेश्वर धरणात पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. या पाण्यातून आम्हालाही पाण्याचे आवर्तन मिळावे, अशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.

उन्हाळी आवर्तनाची मागणी करूनही पाणी न सोडल्याने दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.

3 मेपासून वैजापूर येथील पाटबंधारे कार्यालयाच्या समोर वैजापूर तालुक्यातील व गंगापूर तालुक्यातील एकूण 102 गावातील शेतकरी उपोषणासाठी बसले होते. 11 टीएमसी पाणी आरक्षित असून सुद्धा नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्यात न आल्यामुळे हे उपोषण सुरू होते.

शनिवारी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांनी जलसमाधीचा इशारा दिला होता. जलसमाधी घेण्यासाठी निघालेल्या या शेतकऱ्यांना पोलिसांनी गवंडगाव येथील टोल नाक्यावर अडवले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. आंदोलक शेतकऱ्यांना येवला तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

शेतकऱ्यांना दिला पोलिसांना चकवा

काही आंदोलक शेतकरी पोलिसांना चकवा देत निफाड तालुक्यातील मधमेश्वर पीक अपवेअर धरणापर्यंत पोहोचले होते. धरणात उतरून जलसमाधी घेण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. जोपर्यंत पाणी सोडण्याचा लेखी आदेश प्राप्त होत नाही, तोवर आंदोलन सुरूच ठेवू असा इशाराच आंदोलकांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT