Cricket Player Digvijay Deshmukh 
मराठवाडा

मुंबई इंडियन्सकडून मराठवाड्याचा दिग्विजय देशमुख खेळणार ‘आयपीएल’

शिवकुमार निर्मळे

अंबाजोगाई (जि.बीड) : आज शनिवारपासून (ता.१९) इंडियन प्रिमियर लीगला (आयपीएल) सुरवात होत आहे. आयपीएल दहा नोव्हेंबरपर्यंत संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. अंबाजोगाई येथील क्रिकेटपटू दिग्विजय देशमुखला या स्पर्धेत चमकण्याची संधी मिळाली आहे. तो मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. या संघात दिग्गजांचा समावेश आहे. त्यामुळे दिग्विजयला मिळालेल्या संधीचे कौतुक होत आहे.

मूळचा वरपगाव (ता. अंबाजोगाई) येथील २१ वर्षीय दिग्विजय फलंदाज, गोलंदाज आहे. मागील हंगामात त्याने महाराष्ट्राकडून पदार्पण केले होते. जम्मू-काश्मीरविरोधात खेळताना त्याने ६१ धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणीचा एक सामना आणि टी-२० च्या लढती तो खेळला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत चांगल्या धावा करून त्याने १५ बळी घेतले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या लिलाव प्रक्रियेत मुंबई इंडियन्सने दिग्विजयला वीस लाखांच्या बेस प्राईजवर घेतले.

अभिनयातही चमक
दिग्विजयचे वडील शिक्षक आहेत. दिग्विजयने क्रिकेटपटू व्हावे म्हणून वडिलांनी त्याला एका क्लबमध्ये दाखल केले. मुंबईत १४ वर्षांखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना त्याला चित्रपटात काम करण्याबाबत विचारणा झाली. छोट्याशा दिग्विजयने होकार देत ‘कायी पो छे’मध्ये अली नावाच्या बालकलाकाराची भूमिका साकारली. अभिनय ही माझी पहिली आवड कधीच नव्हती. मला अनेक मालिका, चित्रपटांचे प्रस्ताव आले. ते नाकारले. क्रिकेटपटू व्हायचे होते. त्यासाठी घरच्यांनी पाठिंबा दिल्याचे तो सांगतो. राष्ट्रीय प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची जडणघडण झाली.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Test Squad Announced: रिषभ पंतचे पुनरागमन, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

Unseasonal Rains Cause: "पीक गेलं, आशा संपल्या… आणि आता जिओ टॅगिंगचा फोटोंचा त्रास शेतकऱ्यांच्या वेदना प्रशासनाला कधी ऐकू येणार?"

Pune Viral Video: बिबट्याची थेट घरात एंट्री! मुलगा झोक्यावर… अन् पुढं काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ व्हायरल!

Women's World Cup : वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या तीन लेकींना प्रत्येकी २.२५ कोटी, अमोल मुझूमदार यांना...

Mumbai News: पुलाचे काम रखडले! घाटकोपरमध्ये पाच वर्षांपासून दुर्लक्ष; रहिवाशांची गैरसोय

SCROLL FOR NEXT