marigold
marigold 
मराठवाडा

25 शेतकऱ्यांनी केली 10 टन झेंडूच्या फुलाची विक्री

राजेश दारव्हेकर

हिंगोली : वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदे येथील 25 शेतकऱ्यांनी तीस एकरात झेंडूच्या फुलाची लागवड करून दिवाळीला गटाच्या माध्यमातुन 10 ते 15 टन फुलाची 30 रुपये प्रमाणे विक्री केली आहे. 

पांगरा शिंदे येथे पांरपारीक शेती बरोबर नथुराम शिंदे, किशन शिंदे, उध्दव शिंदे, तानाजी शिंदे, गुलाबराव शिंदे, सोपान शिंदे, संजय शिंदे, गजानन शिंदे, केशव शिंदे, गणेश शिंदे, विकास शिंदे, आंनदराव शिंदे, वसंतराव शिंदे, गोविंद शिंदे, माधव शिंदे यासह 25 शेतकऱ्यांनी जुर्ले महिण्यात झेंडूच्या फुलाची लावगड केली आहे. 

यात तीस गुंठे जमीनीसह एक एकराचा समावेश आहे. या शेतकऱ्याकडे बोअरवेल, विहीरीला असलेल्या पाण्याचा उपयोग त्‍यांनी फुलासाठी केला आहे. तसेच दोन वेळेस खताची मात्रा तर तीन वेळेस फवारणी केली आहे. झेंडूच्या फुलांचे दोन बहार येत असल्याने दसऱ्या एक बहार विकला आहे. त्‍यांनतर दिवाळीला फुलाचे महत्‍व असल्याने दिवाळीला देखील या शेतकऱ्याच्या फुलांची विक्री झाली आहे. 

चार ते पाच शेतकरी एकत्र येवून त्‍यांनी नागपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड, औरंगाबाद आदी मोठ्या शहरात सोमवारपासून (ता.5) फुले विक्रीसाठी नेली आहेत. तर काही शेतकऱ्यांनी मंगळवारी देखील फुले विक्रीसाठी नेली यातील काही शेतकऱ्यांनी जागेवरच पंचवीस रुपये किलो प्रमाणे त्‍याची विक्री केली आहे. बाहेर गावात फुले विक्रीसाठी घेवून गेलेल्या शेतकऱ्यांना तीस रुपये प्रमाणे भाव लागल्याचे त्‍यांनी सांगितले. 

दसऱ्याला विकेलेल्या फुलाच्या माध्यमातुन खर्च निघाला तर दिवाळीला विकेलेल्या फुलापासून बोनस मिळाल्याचे शेतकरी सांगत आहेत. पारंपारीक शेती बरोबर फुल शेती व रेशीम शेती, भाजीपाला पिकविणारे अनेक शेतकरी गावात आहेत. शेती निसर्गावर अवलंबुन असल्याने कशी सुकाळ तर कधी दुष्काळ असतो मात्र यात न डगमगता परिस्‍थितीवर मात करण्यासाठी वेगळा पर्याय शोधने काळाजी गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

उध्दव शिंदे (फुल उत्‍पादक शेतकरी) ः मागच्या काही वर्षापासून झेंडूची लागवड करीत आहे. कधी नफा तर कधी तोटा होतो. मात्र कमी खर्चात दोन वेळेस बहार येणारी फुले आर्थीकस्‍तर उंचावण्यास मदत देखील करतात. अनेक शेतकऱ्यानी त्‍याची लागवड केल्याने नियोजन व विक्रीची बाजारपेठ समजत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT