Marigold flowers sakal
मराठवाडा

Marigold flowers : जळकोटला फुलली झेंडू फुले

उमरदरा येथील शेतकऱ्याचा प्रयोग ; दसरा-दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज

विवेक पोतदार

जळकोट : दसरा- दिवाळी सण तोंडावर आले असताना त्यासाठी लागणाऱ्या झेंडूच्या फुलाची लागवड करत उमरदरा (ता. जळकोट) येथील एका तरुण शेतकऱ्याने सणासाठी आधार निर्माण केला आहे.

यावर्षी सुरवातीला जास्त पाऊस व मध्यंतरी पंचवीस दिवस पाऊस नसल्यामुळे खरिपातील पिके अडचणीत सापडली. परंतु झेंडु फुलांची लागवड करत यातून आर्थिक आधार निर्माण केला आहे.

दसरा-दिवाळी सणाला झेंडु फुलांना मोठी मागणी असते. कारण पूजा-अभिषेक तसेच दुकानदारांचे लक्ष्मीपूजन असते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर फुलांची मागणी असते. त्यादृष्टीने काही शेतकर्यांनी आपल्या शेतात हा प्रयोग केला आहे. भाव चांगला लागला तर दिवाळी सणासाठी या शेतकर्यांना आर्थिक आधार मिळणार आहे. बाजारपेठत भाव किती मिळेल? हे आताच सांगणे कठीण आहे.

उमरदरा (ता.जळकोट) येथील तरुण शेतकरी परमेश्वर बालाजी जोगपेटे यांनी आपल्या शेतात अर्धा एकर क्षेत्रावर इंडस अष्टगंधा झेंडू फुलांची लागवड केली असून लातूरच्या एका नर्सरीमधून रोपटे आणले. विहिरीचे पाणी देत दोन वेळेस खत व चार फवारण्या केल्या असून दसरा सणाला तोडणी सुरु होणार आहे. या सणाला चार ते पाच क्विंटल फुले निघतील परंतु दिवाळीला मात्र १५ ते २० क्विंटल फुल उत्पादन अपेक्षित आहे. यातून भाव चांगला लागला तर सव्वा ते दीड लाख रूपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे शेतकरी परमेश्वर जोगपेटे यांनी सांगितले. परिसरातील बाजारपेठात त्याची विक्री केली जाणार आहे.

श्री जोगपेटे यांनी सांगितले की, अष्टगंधा झेंडुचे तीन हजार रोपटे आणून त्याची लागवड अशा वेळी केली की ते बरोबर दसरा दिवाळीला तोडणी व्हावी. असा उद्देश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT