Politics 
मराठवाडा

Politics : मविआच्या संचालकांना मारहाण करून पळवलं? बाजार समिती सभापती निवडीवेळी हायहोल्टेज ड्रामा

आनंद खर्डेकर

परंडा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित महाविकास आघाडीतील फिरायला गेलेल्या संचालकांना मारहाण करून पळवून नेल्याची चर्चा सभापती उपसभापती निवडीचा दिवशी बुधवारी (ता. २४) सकाळी सुरु झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली.

बाजार समितीच्या समोर दोन गटात मोठी बाचाबाची झाली. पोलीसांनी वेळीच दखल घेतली. बळाचा वापर केल्याने वाद वाढला नाही. उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोटे बाजार समितीच्या आवारात तळ ठोकून होते. परिसरात तणावपूर्ण शांतता होती.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापतीच्या निवडीसाठी बुधवारी (ता. २४) बोलावण्यात आलेल्या विशेष सभेच्या वेळी एकही संचालक उपस्थित न राहिल्याने सभा तहकुब करण्यात आली. शुक्रवारी (ता. २६) पुन्हा सभापती उपसभापती निवडीसाठी सभा बोलवण्यात आली आहे.

आमदार ज्ञानेश्वर पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या नेतृत्वखाली महाविकास आघाडीने १८ पैकी १३ जागेवर विजय मिळवला आहे. तर महायुतीला पाच जागा जिंकता आल्या.

सभापती व उपसभापती या पदाची निवड करणेसाठी बुधवारी (ता. २४) सकाळी ११:३० वाजता विशेष सभा आयोजित केलेली होती. सभेसाठी दोन्ही गटाचे संचालक उपस्थित राहलेले नाहीत. महाविकास आघाडी संचालक फिरण्यास गेले असताना त्यांना मारहाण करून पळून नेहल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

आवश्यक गणपूर्ती संख्येइतके सदस्य हजर नसल्यामुळे ११.३० ते १२.०२ वाजेपर्यंत नवनिर्वाचित संचालक मंडळाला उपस्थित राहणेबाबत वेळ देण्यात आला. त्यानंतरही एकही संचालक हजर राहिले नसल्यामुळे सभा कोरम अभावी तहकूब करण्यात आली व तहकूब केलेली सभा शुक्रवारी (ता. २४) घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT