तिवटघ्याळ (ता. चाकूर) - कृषी सहायक सुनीता चात्रे यांच्या विवाहाला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी उपस्थिती लावण्याचा शब्द पाळला. 
मराठवाडा

आधी लगीन ‘जलयुक्त’चे नंतर ‘ती’चे...!

धोंडोपंत कुलकर्णी

हडोळती - तिवटघ्याळ (ता. चाकूर) जेमतेम ५० ते ६० उंबरठ्यांचे गाव अन्‌ त्या गावात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या युवतीच्या लग्नाला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत वऱ्हाडी म्हणून हजर राहणार हा औत्सुक्‍याचा विषय होता. जिल्हाधिकारी लग्नाला येणार म्हणून प्रशासनही सज्ज होते.

प्रशासकीय कामात व्यस्त असताना जिल्हाधिकाऱ्यांनी वेळात वेळ काढून लग्नाला वऱ्हाडी म्हणून उपस्थिती लावली. स्वतःच्या लग्नापेक्षा जलयुक्त शिवारच्या कामांना प्राधान्य देणाऱ्या येथील कृषी सहायक सुनीता चात्रे यांच्या लग्नाला उपस्थित राहण्याचा दिलेला शब्द श्रीकांत यांनी बुधवारी (ता. दोन) पाळला.  

सुनीता चात्रे यांचे लग्न डिसेंबर २०१७ महिन्यात ठरले होते. हडोळतीला जलयुक्त शिवारचे मोठे काम होते. दुष्काळमुक्तीच्या दिशेने गावाचे हे पाऊल मोठे होते. यातच ‘सकाळ रिलीफ फंडा’ने नाळा सरळीकरणासाठी फंड दिला होता. ‘सकाळ रिलीफ फंडा’तून नाला सरळीकरणाचे उद्‌घाटन जी. श्रीकांत यांच्या हस्ते झाले. या वेळी हडोळतीच्या अकरा नाल्यांचे सरळीकरण होत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या वेळी एवढे मोठे काम होत असताना ही जबाबदारी नवख्या चात्रे यांच्यावर होती. या कामांतून दहा दशलक्ष घनफूट पाणी साठणार होते. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचनाही केली होती; परंतु लग्न ठरल्याने या कामात अडथळा येणार होता. गावाच्या भल्यासाठी स्वतःच्या लग्नाची तारीख पुढे ढकलत जलयुक्त शिवाराची कामे वेळेत पूर्ण करणाऱ्या चात्रे यांच्या कामाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती. जलयुक्त शिवाराच्या आढावा बैठकीत चात्रे यांचा गौरव करीत त्यांच्या लग्नाला वऱ्हाडी म्हणून उपस्थिती राहण्याचा शब्द त्यांनी दिला आणि तो पाळलाही. या लग्नात जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडून मुलीचे कौतुक ऐकून वधुपिता-मातेलाही मुलीचा अभिमान वाटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

Bullock Cart Race Accident : बैलांच्या पायात अडकला तरुण, बैलगाडीखाली चिरडले जाताना सुदैवाने बचावले; शर्यतीत दुचाकीस्वारांचा थरकाप उडवणारा अपघात

Horoscope : उद्या बनतोय संकष्टी लाभ योग! पुढचे तीन दिवस 'या' 3 राशींसाठी गोल्डन टाइम; पैशाची अडचण होईल दूर, अडकलेल्या कामांची पूर्ती

Satara ZP Politics : साताऱ्यात झेडपी सभापती निवडीवर राष्ट्रवादी-शिवसेनेचा बहिष्कार; शंभूराज देसाई-मकरंद पाटलांचा 'मास्टरस्ट्रोक', पण भाजपचा मार्ग झाला मोकळा

नागपुरात हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत १४ वर्षांचा मुलगा बेपत्ता; संतापलेल्या नागरिकांकडून रस्ताजाम, पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT