Shirur Anantpal News 
मराठवाडा

येरोळमध्ये विवाहितेची आत्महत्या, सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ

शिवानंद भुसारे

येरोळ (जि.लातूर) : येरोळ (ता.शिरुर अनंतपाळ) येथील विवाहित महिलेने सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता १२) घडली. अंकिता सुधाकर गरिबे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. अंकिता यांना सासरच्या मंडळीकडून माहेरहून ट्रॅक्टर घेण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी पती, सासरा, सासूकडून सतत छळ केला जात होता. या छळास कंटाळून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पती सुधाकर गरिबे, नारायण गरिबे, शिवकन्या गरिबे, रंजना बावनचे यांना अटक करण्यात आले असून त्यांच्या विरुध्द संदीपान सताळे (रा.लोणी) यांच्या फिर्यादीवरुन शिरुर अनंतपाळ येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस उपनिरीक्षक एम.सी.स्वामी करीत आहेत.

उदगीर पुन्हा हादरले, कोरोनाचा चौथा बळी
उदगीर (जि.लातूर) : शहरातील विकास नगर कोरोनाचा आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला असून त्याचा मृत्यु झाला आहे. ही बातमी कळताच उदगीर शहर पुन्हा हादरले आहे. दिवसेंदिवस पॉझिटिव रुग्णांची संख्या वाढत असल्याने उदगीर शहर व परिसरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील विकास नगर येथील एका ७० वर्षीय व्यक्तीला तब्येत बरी नसल्याने तीन दिवसांपूर्वी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तब्येत खालावत असल्याने त्यास लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले होते.

या व्यक्तीस उच्च रक्तदाब मधुमेह व इतर काही आजार होते या व्यक्तीवर बायपास सर्जरी करण्यात आली होती.या परिस्थितीत लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात या व्यक्तीचा स्वॅब तपासण्यासाठी घेण्यात आला होता. त्याचा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल गुरुवारी (ता.११) रात्री उशिरा आला होता. या रुग्णाचा शुक्रवारी (ता.१२) पहाटे दीड वाजता लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीश हरिदास यांनी दिली आहे. या मृत्यू झालेल्या रुग्णांवर लातूर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान ही बातमी उदगीरात धडकताच पुन्हा शहर हादरले. या रुग्णांचा अहवाल वैद्यकीय महाविद्यालयाने तपासणीसाठी दिला असल्याने उदगीरला याची माहिती मिळाली नाही. गुरुवारी उदगीरला फक्त तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले असल्याची नोंद झाली होती. मात्र हा चौथा रुग्ण ही उदगीरचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

HDFC Bank: एचडीएफसी बँकेला मिळाले नवे प्रमुख! अनूप बागची सांभाळणार एमडी आणि सीईओ पदाची धुरा

ICC ODI World Cup 2027 India Fixture: India vs Pakistan एकदा नव्हे, तर तीनवेळा भिडणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार...

Sugar Price Hike : साखरेचे दर पुन्हा वाढणार की कमी होणार? केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय; व्यापाऱ्यांची कोंडी होणार

Crop Panchnama Maharashtra : दुष्काळी तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे करा; ग्रामसेवक, तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तीन दिवसाच्या सुट्ट्या रद्द

SCROLL FOR NEXT