mayur borde sakal
मराठवाडा

Jalana News: शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकाला मयुर बोर्डेंनी दिला चोप

Swabhimani Shetkari Sanghatana leader Mayur Borde barged into the bank and thrashed him on Tuesday: बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना नाहक त्रास देत अडवणूक केली जाते अशी तक्रार मयुर बोर्डे यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी केली होती.

सकाळवृत्तसेवा

जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील वरूड बुद्रुक येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयुर बोर्डे यांनी बँकेत घुसून मंगळवारी (ता.१३) चोप दिला.

बँक ऑफ महाराष्ट्र चे वरुड शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून धीरेंद्र सोनकर महिनाभरापूर्वी रुजू झाले होते दरम्यान रुजू झाल्यानंतर बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना नाहक त्रास देत अडवणूक केली जाते अशी तक्रार मयुर बोर्डे यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी केली होती.

mayur borde

यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मयुर बोर्डे शेतकऱ्यांसह बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वरूड येथे मंगळवारी (ता.१३) पोहचले, पिक कर्ज , भरा केव्हा भरणार असे लेखी लिहून द्या अशी अडवणूक करीत करून,निराधार,वयोवृध्द,विधवा, दुधाचे अनुदान,घरकुलाचे अनुदान अशा सह बँकेत जमा झालेल्या पैशाला व्यवस्थापकाने हॉल्ड लाऊन ठेवले असल्याने श्री बोर्डे यांनी व्यवस्थापक धरेंद्र सोनकर यांना जाब विचारत त्यांच्या कानशिलात लगावली.

व्यवस्थापकाला मारहाण करत नागरिकांना दवाखान्यासाठी पैसे हवे होते, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पाहिजे होते परतू ते पैसे काढता येत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असे म्हणत मयुर बोर्डे यांनी बँकेत घुसून जाब विचारत शाखा व्यवस्थापकाला चोप दिला.शेतकऱ्यांची अडवणूक केली तर सोडणार नाही असा इशारा मयुर बोर्डे यांनी या वेळी दिला. दरम्यान शाखा व्यवस्थापक धीरेंद्र सोनकर यांनी मारहाणी संदर्भात तक्रार देण्यासाठी जाफराबादचे पोलीस स्टेशन गाठले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

बाबो! चहरची गोलंदाजी बिग बॉसच्या घरात दिसणार, दीपक चहरची खरंच एन्ट्री होणार? आवेजच्या एक्झिटनंतर शोमध्ये मोठा ट्विस्ट

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

SCROLL FOR NEXT