MBBS MD completed after marriage 
मराठवाडा

या ओवाळणीपुढे दुसरी ओवाळणीही फिकी

मधुकर कांबळे

औरंगाबाद - दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी स्त्रिया पतीला तसेच माहेर आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात. या दिवशी पतीचे औक्षण केले जाते आणि पती पत्नीला ओवाळणी देत असतो. लग्नाची बोलणी होताना दिलेला शब्द कितीही अडचणी आल्या तरी पाळून पत्नीला एक
आगळीवेगळी ओवाळणी दिली आहे येथील अरविंद गुंगे यांनी. त्यांनी त्यांच्या पत्नीला लग्नानंतर एमबीबीएस, एमडीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देऊन सर्वतोपरी मदत केली.

या अविस्मरणीय ओवाळणीमुळे माझ्या आयुष्यात खरे आयडॉल, आधारस्तंभ तेच आहेत, अशा भावना डॉ. सरोज गुंगे यांनी व्यक्त केल्या. डॉ. गुंगे पतीने दिलेल्या या आगळ्यावेगळ्या ओवाळणीविषयी म्हणाल्या, "डॉक्‍टर होणे माझे स्वप्न होते. बारावीला असताना माझे लग्न जमले. तेव्हा वाटले, आता पुढे शिक्षण होईल किंवा नाही. मला डॉक्‍टर व्हायचेय हे माझ्या वडिलांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी आमच्या मुलीची डॉक्‍टर होण्याची इच्छा आहे. तुम्ही लग्नानंतर शिकवाल का, असे विचारल्यावर
तेव्हा माझ्या मोठ्या दिराने तिची इच्छा असेल तितके शिकवू, असा शब्द दिला आणि मोठ्या भावाने दिलेला शब्द माझे पती अरविंद यांनी पूर्णपणे पाळला. 

कितीही आर्थिक अडचणी  आल्या तरीही त्यांनी मला त्याची जाणीव न होऊ देता प्रवेशापासून मी वैद्यकीय पदवी घेईपर्यंत एखादे वडील आपल्या लहान मुलीच्या करिअरसाठी धडपडतात अगदी तसे परिश्रम घेऊन  मला शिकवले म्हणून आज मी नुसती एमबीबीएस नव्हे तर एमडी डॉक्‍टर झाले आहे. 
  
आर्थिक अडचण कळूही दिली नाही 

डॉ. सरोज म्हणाल्या, बारावीच्या निकालानंतर मेडिकल कॉलेजचा प्रवेश फॉर्म भरण्यापासून मला रोज मेडिकल कॉलेजला नेऊन सोडणे व आणण्यापर्यंत सर्व काही तेच करायचे. आर्थिक अडचणी खूप होत्या. सिडको एन-आठमध्ये आम्ही किरायाच्या एका खोलीत राहायचो. तेव्हा हे देवगिरी बॅंकेत नोकरी करायचे. पगार दीड हजार रुपये मिळायचा.

यामुळे आमच्या नातेवाइकांनी माझ्या पतीला पुन्हा पुन्हा विचारले की, मेडिकलचे शिक्षण पूर्ण करण्याला चार-पाच वर्षे लागतील. खर्चही खूप आहे, पुन्हा विचार करा; पण त्यांनी माझ्या स्वप्नापुढे या सर्व अडचणींवर मात करण्याचे ठरवले होते. त्यावेळी एका वर्षाची 12 हजार फीस होती; पण नेमके त्या वर्षापासूनच ती 25 हजार रुपये झाली होती. माझे एमबीबीएस पूर्ण होईपर्यंत ज्यावेळी पैशांची गरज असायची त्या-त्या वेळी स्वत: मॅनेज करायचे. किती खर्च येत होता, हे मला कधी कळूदेखील दिले नाही. यापेक्षा माझ्यासाठी दुसरी कोणती मोठी ओवाळणी असू शकत नाही, असे सांगताना त्यांच्या प्रत्येक वाक्‍यागणिक पतीचा त्याग, त्यांनी दिलेल्या पाठबळाविषयी कृतार्थ भाव व्यक्‍त होतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein files : रशियन पासून अफ्रिकन पर्यंत अशा निवडल्या जायच्या मुली, कसा ठरवला जायचा रेट? जगाला हादरवणारे High Profile Sex Scandal

IPL 2026 Update: कॅमेरून ग्रीनसाठी २५.२० कोटी मोजणारा KKR संघ विक्रीला; शाहरूख खान, जुही चावला यांचा आहे मालकी हक्क, पण...

Latest Marathi News Live Update : मीरा रोडमध्ये भाजपाला मोठा धक्का

नाटकप्रेमींनो लक्ष द्या! विजय केंकरे दिग्दर्शित "सुभेदार गेस्ट हाऊस" लवकरच रंगभूमीवर; कधी आहे शुभारंभाचा प्रयोग

Epstein Files उघड! फोटो सोडा... १८ अन् १९ सेकंदाचा व्हिडिओ देखील व्हायरल, बेडरूम, स्नानगृह अन् रहस्यमय खोली...

SCROLL FOR NEXT