file photo 
मराठवाडा

पाथरीकर बंद न करता करणार महाआरती...

धनंजय देशपांडे

पाथरी : संतश्रेष्ठ साईबाबा यांच्या जन्मभूमीवरुन निर्माण झालेल्या गैरसमजातून शिर्डीच्या ग्रामस्थांनी बंद पुकारला आहेत. यापार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी पाथरी येथे शनिवारी (ता.१८) झालेल्या कृती समितीच्या बैठकीत मंगळवारी (ता.२१) जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत महाआरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाथरी येथील राष्ट्रवादी भवनात साईस्मारक समितीचे अध्यक्ष सीताराम धानु यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या बैठकीस आमदार बाबाजानी दुर्राणी, विश्वस्थ संजय भुसारी, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, उपजिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत आमदार दुर्राणी यांनी आपल्या मनोगतात दोन दिवसांपासून होत असलेल्या घडामोडीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले शिर्डीकर विनाकारण वाद वाढवित असून त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी कृती समिती समर्थ आहे. या वेळी पाथरी बंद करण्यावर कृती समिती व ग्रामस्थांत चर्चा झाली. यात बंद ठेवण्याचा निर्णय न घेता मंगळवारी (ता.२१) खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, सुरेश वरपूडकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाआरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला शहरातील व्यापारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


साई जन्मभूमीचा विकास हवा
साई जन्मभूमीच्या विकासासाठी प्रस्तावित केलेल्या १०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिल्यानंतर ‘साई जन्मभूमी’चा वाद चांगलाच पेटला आहे. दरम्यान, गुरुवारी (ता.१६) ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत शिर्डीकरांकडून जन्मभूमीला होणाऱ्या विरोधावर चर्चा झाली. तर जन्मभूमीच्या विकासासाठी एक कृती समिती स्थापन करण्यात आली. साई जन्मभूमी असलेल्या पाथरी या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (ता.नऊ) जानेवारी रोजी औरंगाबाद येथील बैठकीत शंभर कोटीच्या विकास आराखड्यास मंजुरी दिल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर शिर्डीचे महत्त्व कमी होईल, या कल्पनेमुळे शिर्डीकरांकडून पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी नसल्याचे विधान करून वाद सुरू केला आहे. या वर वाद न करता भाविकांना साई जन्मभूमीचा विकास हवा आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT