file photo 
मराठवाडा

‘या’ महापालिकेची सभा निर्णयाविनाच बारगळली !

सकाळ वृत्तसेवा

परभणी : नवीन पाणीपुरवठा योजनेतील वितरण व्यवस्थेवर नळजोडणी दर निश्चितीसाठी मंगळवारी (ता.२१) आयोजित विशेष सभा निर्णयाविनाच संपली. अनामत रक्कम चार वरून दोन हजारांवर आली. परंतु, नळजोडणीसाठी एजन्सीने दिलेले प्रत्येकी दहा हजार रुपयांचे दरपत्रक रद्द करण्यात आले. वॉटरमीटर पालिकेने खरेदी करावे, यावरदेखील चर्चा झाली. मात्र, दरनिश्चित झालीच नाही व या निर्णयाविनाच सभा संपली. त्यामुळे पुढील उन्हाळा निम्म्या शहरासाठी पूर्वीसारखाच जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

परभणी येथील बी. रघुनाथ सभागृहात मंगळवारी (ता. २१) महापौर अनिता सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली फक्त नळजोडणी शुल्क निश्चितीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त रमेश पवार, उपमहापौर भगवान वाघमारे, नगरसचिव विकास रत्नपारखे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सुरवातीलाच मागणीप्रमाणे आयुक्त रमेश पवार, शहर अभियंता वसीम पठाण यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेची इत्यंभूत माहिती दिली. आयुक्त श्री. पवार म्हणाले, ‘‘योजना जर कायमस्वरुपी सुरू ठेवायची असेल तर चार हजार रुपये अनामत आवश्यक आहे. ही रक्कम २० कोटी होणे अपेक्षित असून त्याच्या व्याजातून योजनेवर होणारा काही खर्च भागवता येतो. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने नळजोडणीसाठी १३ हजारांपेक्षा अधिक खर्च येऊ शकतो, असे सांगीतले; पण, एजन्सीने चर्चा करून दहा हजार रुपये दर दिला आहे. प्रशासनाचा या दराला बहुतांश सदस्यांनी विरोध केला. चर्चेअंती अनामत रक्कम दोन हजार करण्यात आल्याचे उपमहापौर भगवान वाघमारे यांनी जाहीर केले. मात्र, नळजोडणी शुल्काबाबत मात्र एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे संबंधित एजन्सीचे दरपत्रक रद्द करण्याचा निर्णय झाला.’’

दरपत्रक रद्द करा
ज्येष्ठ सदस्य अतुल सरोदे, सुशील कांबळे, नाझनीन पठाण, सचिन देशमुख, सभागृहनेते माजुलाला, विरोधी पक्ष नेते विजय जामकर, मोकिंद खिल्लारे, गणेश देशमुख, मोकिंद खिल्लारे, सचिन अंबिलवादे, प्रशास ठाकूर, इम्रानलाला आदींनी या दराबाबत आपली मते मांडली. दर कमी करण्यात यावेत, स्लम एरियात वेगळे दर असावेत, दहा हजारांतील अनावश्यक खर्च कमी करा, मीटर बसवल्यावर बिल कमी येणार का, वॉटरमीटर पालिकेतर्फे खरेदी करा, कमी पैशात पाणी द्या, ज्यांनी नळ कनेक्शन बंद करण्यासाठी अर्ज दिले त्यांना लावलेली पाणीपट्टी कमी करा, कमी पैशात पाणी द्या, सर्वांना सारखे शुल्क लावा, योजना चालविण्यासाठी खर्च लागतो. त्यामुळे गरीब-श्रीमंत वाद करू नका, दरपत्रक रद्द करा, अशा प्रकारची मते त्यांनी मांडली. 

अनामत रक्कम दोन हजारांनी कमी 
प्रशासन एजन्सीने दिलेल्या व अनामत रकमेचे दर का आवश्यक आहेत, हे पोटतिडकीने वारंवार सांगत असतानादेखील लोकसेवकांचा विरोध मात्र, शेवटपर्यंत कायम होता. शेवटी उपमहापौर श्री. वाघमारे यांनी योजनेला दरमहा एक कोटी रुपये खर्च लागणार. कमी पैशात पाणी देणे हे आपले कर्तव्य आहे. परंतु, खर्चदेखील निघाला पाहिजे. अनामत रक्कम दोन हजार करावे, वॉटरमीटर पालिकेतर्फे खरेदी करावे, जोडणीचा खर्च कमी करावा, सर्वसामान्यांना परवडणारे दर असावेत, अशा प्रशासनाला सूचना केल्या. त्यामुळे बैठकीत अनामत रक्कम दोन हजारांनी कमी झाली, नळजोडणीची शुल्क निश्चिती मात्र लटकली.

हेही वाचा व पहा - Video : साई जन्मसंस्थानमध्ये महाआरती


विभागप्रमुखांना तंबी, कारवाईचा इशारा
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी मागीतलेली माहिती विभाग प्रमुखांकडून नेहमीच थातूरमातूर पद्धतीने दिली जाते. पुढच्या वेळी सांगतो म्हणून किंवा अन्य कारणे सांगून टोलवले जाते. शहरात नळजोडण्या किती, किती झोन, पाणी वितरण कसे केले जाते आदी प्रश्नांवर विभाग प्रमुखांची भंबेरी उडाली. परिपूर्ण माहिती असेल तरच सभागृहात येऊ दिले जाईल, सदस्यांच्या सूचनांचे पालन करा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा उपमहापौर श्री. वाघमारे यांनी दिला.

उन्हाळ्यात नवीन योजनेचे पाणी मिळणे अशक्य


प्रशासन विशेष सभेत नळजोडणी शुल्क निश्चित होऊन नळजोडण्यांना सुरवात होईल, उन्हाळ्यात पाणी देऊ अशी प्रशासनाला अपेक्षा होती. मात्र, झाले उलटेच. आता वॉटरमीटरसाठी निविदा मागविणे, त्याला मंजुरी देणे, अन्य कामांसाठी शुल्क निश्चित करणे, यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. महापालिकेच्या निविदा कुणी भरतच नाही. दोन-तीन वेळेस टेंडर द्यावे लागते. एखाद्या एजन्सीला खासगीत बोलून टेंडर भरण्यास सांगितले जाते. तेव्हा एकाच टेंडरवर काम निश्चित केले जाते, असे अनेक वेळा झाले आहे. त्यामुळे टेंडरप्रक्रियेसाठी एक-दीड महिना, मंजूर झाले, दरही कमी केले तरी नळजोडण्यांसाठी किमान दोन महिने लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येता उन्हाळादेखील टँकरच्याच पाण्यावर भागवावा लागण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईचे संकट मात्र कायम आहे.


‘सकाळ’च्या बातमीची दखल
उत्पन्नवाढीसाठी पालिकेची ‘अळीमिळी गुपचिळी’ या मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या बातमीची सभागृहात दखल घेण्यात आली. आरोग्य सभापती सचिन देशमुख यांनी या बाबत दखल घेण्याची सूचना केली. यावर उपमहापौर भगवान वाघमारे यांनी उत्पन्नवाढीसाठी विशेष सभा घेण्यात येणार असल्याची घोषणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT