सीना (ता. कर्जत, जि. नगर) येथील धरण. 
मराठवाडा

झुळझुळ पाण्याने तहान भागेना 

अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी (जि. बीड) - आष्टीतील टॅंकर भरण्यासाठी शेवटचा आधार असलेल्या सीना (ता. कर्जत, जि. नगर) धरणात सध्या कुकडीचे आवर्तन सुरू असले, तरी क्षमतेपेक्षा अतिशय कमी वेगाने पाणी सोडले जात असल्याने सीनात येईपर्यंत निम्मे पाणी प्रवासातच जिरत आहे. त्यामुळे वीस दिवस होऊनही सीनात अपेक्षित जलसाठा झालेला नसून, उपसा सिंचन योजनेद्वारे मेहेकरीत पाणी येण्याचा मार्गही खुंटला आहे. 

पाच धरणांचा एकत्रित प्रकल्प असलेल्या कुकडीमधून ओव्हरफ्लोचे पाणी सोडून दुष्काळग्रस्त भागाची तहान भागविली जाते. सध्या कर्जत परिसरात आष्टीसारखीच दुष्काळी स्थिती असून, कुकडीच्या धरणक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने सहा ऑगस्टपासून सीनात आवर्तन सुरू करण्यात आले आहे. सीनातून कार्यान्वित केलेल्या उपसा सिंचन योजनेद्वारे आष्टी तालुक्‍यातील मेहेकरी धरणात पाणी सोडण्याचे नियोजनही होते; परंतु वीस दिवस उलटूनही सीनात अपेक्षित जलसाठा झालेला नाही. 

सध्या केवळ कुकडीतून 100 क्‍युसेक वेगाने पाणी सोडले जात असून, धरणात अवघे 60-70 क्‍युसेक पाणी येत आहे. त्यामुळे अजूनही अपेक्षित साठा झालेला नाही. पूर्ण म्हणजे 300 ते 400 क्‍युसेकने पाणी सोडल्यास साधारण महिनाभरात सीना धरण भरते. नंतरच मेहेकरीत पाणी आणता येणार आहे; परंतु या झुळझुळ पाण्याने सीनाची तहान कायम आहे. परिणामी, मेहेकरीतही पाणी आलेले नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT