Crime sakal
मराठवाडा

Ashti Crime : मतीमंद तरूणीवर चार नराधमांचा अत्याचार; अवघ्या दोन तासात आरोपींना घेतले ताब्यात

आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामध्ये २५ वर्षीय मतीमंद व मुकबधीर तरूणीवर चार नराधमांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (ता. चार) उघडकीस आली.

अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी - तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामध्ये २५वर्षीय मतीमंद व मुकबधीर तरूणीवर चार नराधमांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (ता. चार) उघडकीस आली. अंभोरा पोलिस ठाण्यात वरील चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आले असून पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपींना ताब्यात घेतले.

याबाबत अंभोरा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांना एका गावामध्ये शुक्रवार (ता. चार) २५वर्षीय मतीमंद, मुकबधिर मुलीवर बलात्कार झाला असल्याची माहिती फोनवरुन मिळाली.

त्यानुसार साळवे यांनी पोलिस उपनिरीक्षक देविदास सातव, पोलिस अंमलदार सुदाम पोकळे यांना घटनास्थळी पाठवले व तरुणीसह तिच्या आईकडीलांना पोलिस ठाण्यात आणून तक्रार नोंदविण्याचे सूचित केले. मात्र, पिडीतेच्या आई-वडीलांनी तक्रार देण्यास नकार दिला.

घटनेची माहिती श्री. साळवे यांनी वरिष्ठांना दिल्यानंतर पिडीतेची वैद्यकीय तपासणी करुन सरकारतर्फे पोलिस उपनिरीक्षक देवीदास सातव यांच्या फिर्यादीवरुन अंभोरा पोलिसांत अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला.

तसेच गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस हवालदार मुकूंद एकसिंगे, बाबुराव तांदळे, भरत माने, संतोष राठोड, मनोज खंडागळे, महिला पोलिस छाया साप्ते, पोलिस नाईक अमोल ढवळे, प्रशांत कांबळे, पोलिस अंमलदार शिवदास केदार, सतीश पैठणे, अमोल सिरसाठ, सुदाम पोकळे, चालक पडवळ यांच्या पथकाने शोध घेऊन गुन्हातील आरोपींना तातडीने ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT