atmhatya 
मराठवाडा

हिंगोलीत व्यापाऱ्यांनी मागितले इच्‍छा दया मरण

राजेश दारव्हेकर

हिंगोली: शहरातील रामलीला मैदानावरील फुटकळ व्यापाऱ्यांना लेखी आश्वासनानंतर पर्यायी जागा न दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी बुधवारी (ता.चार) जिल्‍हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे इच्‍छा दया मरणाची परवानगी मागितली आहे. 


या बाबत शेख आतीखूर रेहमान, वैजनाथ नागरे, कैलास बांगर, शेख पाशा शेख इसूफ, देवा वाबळे, शेख हमीद, श्याम कुटे, चंद्रकांत घोडेकर, दिनकर तडसे, शेख समद, शेख वसीम, शेख शिखूर, रामू कुरील, गजानन चव्हाण, उत्तम राखुंडे, गणेश भोसले, विठ्ठल गरवारे, रमेश फड, शेख हकीम शेख रशीद, भगवान जाधव यांच्यासह पन्नास ते साठ फुटकळ व्यापाऱ्यांनी जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे निवेदन दिले आहे.

यापूर्वी केले होते आंदोलन

रामलिला मैदानावर फुटकळ व्यापाऱ्याचे उदरनिर्वाहाचे साधन अतिक्रमणाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्यात आले. त्‍यानंतर सर्व फुटकळ व्यापाऱ्यांनी वारंवार लेखी व तोंडी निवेदन देऊन आंदोलनदेखील केले. या वेळी उपविभागीय अधिकाऱ्यांनी पर्यायी जागा देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर प्रशासनावर विश्वास ठेवून हे आंदोलन मागे घेतले होते.

आत्‍महत्या करण्याची आली वेळ

या आश्वासनाला दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्यापही शहरात कोठेही पर्यायी जागा देण्यात आली नाही. त्‍यामुळे आत्‍महत्या करण्याची वेळ आली आहे. आत्‍महत्या करणे कायद्याने गुन्हा आहे. शासन व प्रशासन आपले लेखी आश्वासन पाळू शकत नसल्यामुळे सामूहिक इच्‍छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी या निवेदनात फुटकळ व्यापाऱ्यांनी केली आहे.

विजेच्या धक्याने एकाचा मृत्यू

हिंगोली: विद्युत प्रवाह उतरलेल्या शेतातील विद्युत खांबाच्या तणावाला धक्का लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. तीन) इसापूर रमणा येथे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इसापूर रमणा येथील केशव पुंडलिक वाढवे (वय ४५) हे शेतात काम करीत होते. या वेळी विद्युत प्रवाह उतरलेल्या विद्युत खांबाच्या तणावाला त्यांचा स्पर्श झाला. यात त्यांना विजेचा जोराचा धक्का लागून गंभीर जखमी झाले. बाजूला असलेल्या इतरांनी आरडाओरडा केली असता परिसरातील शेतकरी धावत आले. लाकडाचा आधार देत केशव वाढवे यांना बाजूला केले.


उपचारासाठी रुग्णालयात दाखल

त्यानंतर गणेश जगताप, बालाजी हराळे यांनी तातडीने हिंगोली येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पोलिस कर्मचारी प्रवीण राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बुधवारी (ता. चार) सकाळी नऊ वाजता शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. इसापूर रमणा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्‍यान, मयत केशव वाढवे यांच्या पश्चात वडील, पत्‍नी, दोन भाऊ, दोन मुले असा परिवार आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT