milk producer farmer should get compensation mla haribhau bagde demand in winter session 2023 nagpur sakal
मराठवाडा

Phulambri News : दूध उत्पादक शेतकऱ्याला शासनाने अनुदान द्यावे; हरिभाऊ बागडे यांची अधिवेशनात मागणी

राज्यात सुमारे 75 लाख शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाची निवड केलेली आहेत.

नवनाथ इधाटे

फुलंब्री : राज्यात सुमारे 75 लाख शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाची निवड केलेली आहेत. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने दुधाच्या व्यवसायाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळलेले आहे.

मात्र दुधालाही भावना असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमंडू लागले आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती लिटर सात ते दहा रुपये पर्यंतचा अनुदान द्यावे, अशी मागणी फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधिमंडळातील अधिवेशनात सोमवारी (ता.१८) रोजी केली आहे.

फुलंब्री विधानसभा मतदार संघाचे आमदार बागडे पुढे बोलतांना म्हणाले की, राज्यामध्ये शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागात दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणित कोलमंडू लागले आहे.

दुष्काळातून निवडण्यासाठी शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळू लागले आहे. राज्यात जवळपास 75 लाख कुटुंब दुधाच्या व्यवसायात जोडलेले आहे. एकीकडे दुष्काळाने शेतकरी होरपळून निघाला आहे.

तर दुसरीकडे पुन्हा दुधाला भाव नसल्याने शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दुधाला प्रति लिटर 37 ते 40 रुपये भाव होता. मात्र आता हा भाव सात ते दहा रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करणेही अडचणीचे ठरू लागले आहे.

दुष्काळातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे पावले उचलणे गरजेचे आहे. बटर व पावडर मोठ्या प्रमाणात असल्याने दुधाचे भाव पडलेले आहे. त्यामुळे बटर व पावडर निर्यातीला अनुदान द्यावे. शिल्लक असलेले बटर व पावडर निर्यात झाल्यास दुधाला चांगला भाव मिळेल.

तसेच दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती लिटर दहा रुपयापर्यंत अनुदान द्यावे जेणेकरून शेतकऱ्याला दुग्ध व्यवसाय करणे सोपे होईल, अशी मागणी आमदार हरिभाऊ बागडे यांनी विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मध्ये केली आहे.

आमदार हरिभाऊ बागडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल तथा दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मुख्य सचिव यांना प्रस्ताव तयार करण्याचे सांगितलेले आहे. तसेच शेतकऱ्यांना अनुदान देण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झालेली असून केंद्र सरकारसोबत शिष्टमंडळाच्या माध्यमातून चर्चा करून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याचे दुग्ध व्यवसाय तथा महसूल मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT