file photo 
मराठवाडा

औंढा तलावाच्या सांडव्यातुन लाखो लिटर पाणी जाते वाया, पाटबंधारे विभागाचे दूर्लक्ष

कृष्णा ऋषी

औंढा नागनाथ ( जिल्हा हिंगोली ) : येथील औंढा तलावाच्या सांडव्यातून मागील तीन महिन्यापासून आवश्यकता नसतानाही अविरत पाणी जात असल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे तलावाच्या पाणी पातळीत घट होऊन लवकरच तलाव कोरडा पडणार की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. याकडे पाटबंधारे विभागाचे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे.

विशेष म्हणजे याच तलावातून नगरपंचायत मार्फत शहराला व ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे असेच पाणी वाया जात राहिले तर उन्हाळ्यात शहराला मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागणार  आहे.

दरम्यान, या वर्षी झालेल्या चांगल्या पर्जन्याने तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यामुळे ४५ हेक्टरवर विस्तारलेल्या या तलावातून ५९० हेक्टर एवढे सिंचन क्षेत्र ओलीताखाली येते. तर त्याचा लाभ १९ गावांतील रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी होतो. सांडव्याद्वारे २३८ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग केला जातो, परंतु मागील काही महिन्यापासून तलावाच्या सांडव्यातून आवश्यकता नसताना अविरत पाणी विसर्ग होत असल्याने पाणी साठ्यावर परिणाम होऊन झपाट्याने तलावाच्या पाणी पातळीत घट निर्माण होत आहे. त्यामुळे काही दिवसातच तलाव कोरडा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून वाया जाणारे पाणी त्वरित रोखण्यात यावे व कट्ट्यावर वाढलेल्या झाडाझुडपापासून तलावालाच धोका निर्माण होत असल्याने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

America-Iran War: अमेरिका-इराणचा करार का मोडला? युद्ध पुन्हा पेटणार का? इराणच्या 'एवढ्या' ठिकाणांवर हल्ले

Vasai Heavy Rain : वसईमध्ये अतिवृष्टीचा तिसरा बळी; २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Pune Ring Road : भुयारी मार्ग, एचसीएमटीआर, रिंगरोड प्रकल्पासाठी पुणे वाहतूक समितीची स्थापना; राज्य शासनाकडून निर्णय जाहीर

Rajesh Sharma: प्रभासच्या चित्रपटाच्या सेटवर अपघात! बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राजेश शर्मांना विषारी कीटकाचा दंश; प्रकृती गंभीर

Pune News : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण अभियंत्याच्या कुटुंबाला दिलासा; विमा नसलेल्या ट्रकच्या मालक-चालकाला भरावी लागणार दीड कोटींची भरपाई

SCROLL FOR NEXT