file photo
file photo 
मराठवाडा

वसमत मतदारसंघात रस्ते, पुलाच्या बांधकामासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर- आमदार नवघरे 

संजय बर्दापुरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : वसमत विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुल बांधकामाच्या पुर्णत्वासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजू नवघरे यांनी दिली. या विकास कामांच्या पुर्णत्वानंतर मतदारसंघात रहदारीचा वेग वाढणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१- २२ आमदार राजू नवघरे यांनी सभागृहात मतदारसंघातील विविध विकास कामाबाबत आवाज उठवला. विशेष करुन मतदारसंघातील रस्ते व पुलांची दूरावस्था सभागृहासमोर मांडली. या बाबींचा सकारात्मक विचार करुन ‌सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी वसमत मतदारसंघातील रस्ते व पुलाच्या बांधकामासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर केला आहे.

परिणामी मतदारसंघातील विकास कामाला आता वेग येणार आहे. विकास कामांमध्ये वसमत- चुडावा राज्यमार्गाचे चौपदरीकरण काम २० कोटी रुपये व प्रमुख जिल्हा मार्गाचे १६. ८० कोटी रुपयांचे सात कामे आहेत. नाबार्ड अंतर्गत आंबा- चोंडी रस्त्यावरील मोठ्या पुलाच्या बांधकामास दोन कोटी रुपये तसेच गुंडा- कारंजी जिल्हा मार्ग १८ वर मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी दोन कोटी ४८ लाख रुपये, एशियन विकास बँक प्रकल्प अंतर्गत प्रजिमा सात ते वडगाव- गिरगाव ते राष्ट्रीय महामार्ग १६१ वर ६३. २६ कोटी रुपये, प्रजिमा १५ रिधोरा पळशी भुसंपादनासाठी ८. १२ कोटी रुपये, प्रजिमा १६ वसमत दगडगाव- नहाद- जवळा बाजार रस्त्याच्या भुसंपदणासाठी ४. ८० कोटी रुपये, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालय, विश्रामगृह व कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामासाठी ५. ५० कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली असल्याची माहिती आमदार राजू नवघरे यांनी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

Met Gala 2024 : Met Gala कसा बनला फॅशन जगतातला ऑस्कर ? जाणून घ्या यंदाची थीम अन् इतिहास

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

SCROLL FOR NEXT