kalamb police kalamb police
मराठवाडा

पोलिसांची उत्तम कामगिरी! बेपत्ता चिमुकलीचा २४ तासांत लावला शोध

तालुक्यातील डिकसळ परिसरातील एसटी कॉलनीतील मुलगी घरापुढे खेळत होती ती न सांगता निघून गेली होती

दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद): तालुक्यातील डिकसळ येथून ८ मे रोजी बेपता झालेल्या नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास कळंब पोलिसांना (kalamb police station) यश आले आहे. तालुक्यातील डिकसळ परिसरात एसटी कॉलनीत रहाणारी नऊ वर्षाची भाग्यश्री कनगरे घरापुढे खेळत असताना बेपत्ता झाली. वडिलांनी पोलिसांना घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी तीन पथके निर्माण करून तातडीने मुलीचा शोध घेतला.

तालुक्यातील डिकसळ परिसरातील एसटी कॉलनीतील मुलगी घरापुढे खेळत होती ती न सांगता निघून गेली होती. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कळंब पोलिसात रविवार (ता.९) दाखल झाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक राजतीलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी तीन पथके तयार केली. पोलिसांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. शिवाय जिथून मुलगी गायब झाली तेथील काही मजुरांची चौकशी करण्यात आली. तालुक्यातील इटकुर, वाकडी, कोठळवाडी आदी भागात पोलीसांनी तपास केला.

तालुक्यातील शिराढोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असाच प्रकार घडला होता, त्यामुळे येथील पोलिसांनी पथके निर्माण करून मुलीच्या शोधासाठी तत्काळ तपासाची चक्रे फिरविली. प्रथम श्वान पथक रांबोच्या मदतीने बेपत्ता मुलीचा तपास सुरवतीला घरापासून करण्यात आला. शहरातील येरमळा रस्त्यावरील होळकर चौकापर्यत श्वान पथक थांबले त्यामुळे तपासात अडचणी आल्या. नंतर पोलिसांनी कळंब परिसरात वेगाने तपासाची चक्रे फिरविली. १० मे रोजी सहायक पोलिस निरीक्षक अतुल पाटील यांची टीम आंदोरा दिशेने तपास करण्यासाठी गेली असता सदरील मुलगी तालुक्यातील अंदोरा येथिल पुलाखाली झोपली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

अवघ्या २४ तासांत बेपत्ता मुलीचा तपास करून सुखरूप मुलगी आई वडिलांच्या ताब्यात दिल्याने पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, सहायक पोलिस निरीक्षक अतुल पाटील, अशोक पवार, प्रशांत राऊत, शिवाजी सिरसाट, सुलीन कोळेकर, श्री हंगे, मनोज दळवी, गणेश वाघमोडे, सादिक शेख, रवी कोरे, मिनाहज शेख, फरहनका पठाण, दिलीप व्हनडे, हबीब पठाण, शिवाजी राऊत आदींनी शोध घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT