corona
corona 
मराठवाडा

परिसराचे नाव चुकले अन् उडाला गोंधळ, जिवंत रुग्णास दाखविले मयत... 

किशन बारहाते

मानवत ः कोरोनामुक्त झालेल्या एका चौदा वर्षीय मुलीला मयत दाखवण्याच्या प्रताप जिल्हा रुग्णालयाने केला आहे. गुरुवारी रात्री जिल्हा प्रशासनाने प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटमध्ये मानवत भागातील गौड गल्ली येथील एक १४ वर्षीय मुलगी मयत झाल्याची माहिती प्रशासनाने दिली होती. यानंतर सर्वत्र वृत्त प्रकाशित झाल्यावर सदर मुलीच्या कुटूंबाला या प्रकरणाचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. 

शहरातील गोदु गल्ली येथील चौदा वर्षीय मुलगी काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित आढळली होती. तिच्यावर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. कोरोनामुक्त झाल्यानंतर सदर मुलीची सुट्टी झाली. याबाबत खासगी रुग्णालयाने जिल्हा रुग्णालयाला माहिती कळवली. परंतू, गुरुवारी (ता.१३) रात्री उशिरा काढलेल्या प्रेसनोटमध्ये मानवत शहरातील गौड गल्ली येथील चौदा वर्षीय मुलगी मयत असल्याचे दाखवण्यात आले. या प्रकरणाची शहरात चर्चा सुरु झाली. संबंधित प्रेसनोट सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. 

मुलीच्या कुटुंबाला मानसिक त्रास 
मानवत शहरात गौड गल्ली अस्तित्वातच नसल्याने गोंधळ निर्माण झाला. काही दिवसांपुर्वी गोदु गल्लीतील एक चौदा वर्षीय मुलगी कोरोनाबाधित आढळली होती. सदर मुलीच्या कुटुंबाने गावातील नातेवाईकांना व मित्रांना बोलावून सदर प्रकरणाची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता गोदु गल्ली ऐवजी गौड गल्ली असा चुकीचा उल्लेख करून आपल्या जिवंत मुलीलाच मयत दाखवल्याचे समजल्यानंतर त्यांना धक्काच बसला. याप्रकारे मुलीच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. 

यापूर्वी देखील घडली होती अशीच चुक 
यापूर्वी देखील शहरातील पंधरा दिवसापूर्वी मयत झालेल्या दोघांना दोन दिवसापूर्वी परत एकदा मयताच्या यादीत दाखवल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मेनरोड येथील एक पुरुष व राठोड गल्ली येथील एक पुरुष पंधरा दिवसांपूर्वीच मयत झाले होते. परंतू, जिल्हा रुग्णालयाने काढलेल्या प्रेसनोटमध्ये या मयताचा उल्लेख केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 


 
संपादन ः राजन मंगरुळकर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: लोकसभा निवडणुकीत मोदींना 270 पेक्षा कमी जागा मिळाल्यास शेअर बाजार कोसळणार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Viral video: काय सांगता! आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची जीप थेट हॉस्पिटलमध्ये; काय होता त्याचा गुन्हा?

Bigg Boss OTT 3: मराठीनंतर हिंदी बिग बॉसमध्येही होणार मोठा बदल? सलमानच्या जागी 'हा' अभिनेता करणार सूत्रसंचालन?

Latest Marathi News Update: सीएनजी गॅस गळतीमुळे कराड मलकापूर मार्गावर वाहतूक खोळंबली

Virat Kohli : 'क्षणभर असे वाटत होते की...' RCBच्या पराभवानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT