file photo 
मराठवाडा

मालकिणीचा गळा आवळून मोलकरणीचे कृत्य... काय ते वाचा

प्रल्हाद कांबळे

नांदेड : घरमालकिणीचा बाथरुममध्ये नेऊन मोलकरणीने गळा आवळून एक लाख ६० हजाराचे साडेसहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे लंपास केले. ही घटना रविवारी (ता. पाच) जानेवारी सकाळी साडेआठ ते साडेनऊच्या सुमारास देगलूरच्या शिवबानगर येथील मुंडे हॉस्पीटलवर घडली. या घटनेनंतर देगलुर शहरात खळबळ उडाली आहे. 

देगलूर येथील शिवबानगर भागात विनायक चंद्रशेन मुंडे यांचे मुंडे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर ते कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्याकडे घरकाम करण्यासाठी नव्याने शेख रिहाना उर्फ शीतल सतीश इंगळे रा. राजूरा बु. (ता. मुखेड) या महिलेला ठेवले होते. सकाळी ती आपल्या नेहमीच्या वेळेनुसार काम करण्यासाठी त्यांच्या घरी आली. ती घरी आल्यानंतर सकाळी एका रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर दाम्पत्य खाली रुग्णालयात आले. त्यांनी भूलतज्ञ डॉ. सदावर्ते यांनाही बोलावले. सकाळी साडेआठ ते साडेनऊच्या सुमारास शस्त्रक्रिया झाल्यानंतर चहा पिण्यासाठी डॉ. सदावर्ते यांना त्यांनी आपल्या घरी नेले. 

दीड लाखाचा ऐवज लंपास 

यावेळी त्यांची आई आरडाओरडा करीत होती. आईला काय झाले हे पाहण्यासाठी डॉ. विनायक मुंडे तिच्याकडे गेले. घडलेला प्रकार तिने आपल्या मुलाला सांगितला. हे ऐकूण डॉ. मुंडे यांना चांगलाच धक्का बसला. रिहाना हिने त्यांच्या आईला बाथरूममध्ये आंघोळीच्या निमित्ताने नेले. यावेळी त्यांच्या आईचा गळा दाबून तिने त्यांच्या अंगावरील ७० हजार रुपयांचे साडेतीन तोळे वजनाचे गंठण, ७५ हजारांचे अडीच तोळ्याचे लॉकेट आणि १५ हजार रुपयांची साडेसात ग्राम वजनाची मण्याची पोत असा एक लाख ६० हजारांचा सोन्याचा ऐवज जबरीने तोडून घेऊन पळ काढल्याचे सांगितले. 

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट

या घटनेनंतर डॉ. मुंडे यांनी देगलूर पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली. डॉ. विनायक मुंडे यांच्या फिर्यादीवरुन देगलूर पोलिसांनी रिहाना उर्फ शितल इंगळे हिच्याविरुध्द सोमवारी (ता. सहा) जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे, पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी भेट दिली. पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा केला. घडलेला प्रकार हा गंभीर असून यापूर्वी रिहाना हिने असेच काही प्रकार केले का हे तिला अटक केल्यानंतरच समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT