file photo 
मराठवाडा

बाजारपेठ उघडण्याची परवानगी द्यावी;  आमदार डॉ. राहुल पाटील यांचा मुख्यमंत्र्यांसोबत संवाद

सकाळ वृत्तसेवा

परभणी : परभणी जिल्ह्यातील बाजारपेठ दोन महिन्यांपासून बंद असल्याने व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन वगळून इतर ठिकाणची बाजारपेठ उघडण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बुधवारी (ता. २७) केली.
मागील आठवड्यापासून परभणी जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले असून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता काय उपाययोजना करण्यात येत आहे, याविषयीचा आढावा घेण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
यावेळी आमदार राहुल पाटील यांनी परभणी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या सध्याच्या वाढलेल्या संख्येविषयी चिंता व्यक्त केली. सुरवातीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव परभणी जिल्ह्यात कमी असताना तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती आमदार श्री. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

अहवाल येण्यास विलंब

मागील पंधरा दिवसांपासून मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरांतून अनेक नागरिक आणि कामगार जिल्ह्यात परतत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात आणि ग्रामीण भागात वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. सद्यःस्थितीत रुग्णांचे स्वॅब नांदेड येथील लॅब पाठविण्यात येत असून त्यामुळे अहवाल येण्यास विलंब होत आहे. परभणी येथील सामान्य रुग्णालयास मंजूर करण्यात आलेली प्रयोगशाळा चाचणी अवस्थेत आहे. ता. २७ मेपर्यंत जिल्ह्यात ६४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून एकंदरीत १७१ कोरोना रुग्णांचे स्वॅब अहवाल प्रलंबित असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान
बाहेरगावांहून आलेल्या नागरिकांना विलगीकरण करण्यासाठी शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, निरज हॉटेल, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील कक्ष, अक्षदा मंगल कार्यालय, रेणुका मंगल कार्यालय आदी इमारतींमध्ये सोय करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दोन महिन्यांपासून परभणी शहरातील बाजारपेठा कोरोनाच्या संसर्गामुळे बंद असल्याने व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन वगळून परभणीतील बाजारपेठ लवकरात लवकर सुरू करण्यात येऊन व्यापाऱ्यांना दिलासा देण्याची विनंती आमदार पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली. येत्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त उद्‍भवल्यास ग्रामीण भागात करावयाच्या उपाययोजनांबद्दल मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral : तिलक वर्माने विचारला सूर्या दादाला प्रश्न; उत्तर मिळाले, IPL 2026 मध्ये मी कर्णधार नाही, तू हार्दिकला विचार...

१९ वर्षीय तरुणीला परराज्यात नेत २ लाखांत विकलं, फसवून लग्न केलं अन् २ महिने लैंगिक अत्याचार

Sunil Tatkare Viral Photo Controversy : रुपाली चाकणकरांनंतर आता सुनील तटकरेंही गोत्यात? 'त्या' फोटोने वाढवलं टेन्शन! भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण भोवणार?

अधिकाऱ्यानं आयुष्य संपवलं, शेवटच्या व्हिडीओत मंत्र्याचं नाव घेतलं; मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्रि‍पदाचा राजीनामा

Video: 6.6,6,6,6... KKR च्या युवा फलंदाजाने IPL पूर्वीच शतक करत दाखवली ताकद; प्रतिस्पर्ध्यांना रहावे लागेल अलर्ट

SCROLL FOR NEXT