file photo 
मराठवाडा

आमदार डॉ. गुट्टे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे; रस्त्यासह स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी

गणेश पांडे

पालम ( जिल्हा परभणी )  : सार्वजनिक स्मशानभूमी व रस्त्याचा प्रश्न धसास लावल्यानंतरच सिरपूर ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले. दरम्यान, आमदार डॉ. गुट्टे यांनी आगामी दोन दिवसात रस्त्याच्या डागडुजीस सुरुवात करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. डबीटवार यांना दिले आहेत.
 
संचारबंदीमुळे चार ग्रामपंचायत सदस्यांनी सिरपूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर ता. 25 मार्च पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. हे उपोषण सोडण्यासाठी पालम तहसील प्रशासनाचे कर्मचारी पहिल्या दिवशी उपोषण स्थळी आले होते. परंतु ऊपोषणकर्त्याना त्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नव्हते. म्हणून उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी (ता.26) आमदार डॉ. गुट्टे यांनी सकाळी साडेअकरा वाजता उपोषणकर्त्यांना भेट दिली. उपोषणस्थळावरुनच  जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश विटेकर यांच्याशी फोनवर संवाद साधून रस्त्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासंदर्भात चर्चा केली. कोणत्या मार्गाने हा रस्ता तातडीने होईल, याची चर्चा केली. तेव्हा येत्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केरवाडी ते सिरपूर रस्त्यासाठी निधीची तरतूद करण्याचे आश्वासन डॉ. गुट्टे यांनी श्री. विटेकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दिले. तत्पूर्वी रस्त्याची डागडुजी करण्याचे आदेश डॉ. गुट्टे यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री. डबीटवार यांना दिले आहेत.

सोबतच गावात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन दिल्यानंतर तिचा मोबदला देऊ, असे आश्वासन गटविकास अधिकारी आर. व्ही. चकोर यांनी आमदार डॉ. गुट्टे यांच्याशी चर्चा केल्यानंतर दिले. तेव्हा स्मशानभूमीचा विकास आपण स्वतः करेल, अशी ग्वाही डॉ. गुट्टे यांनी दिली. तत्पूर्वी डॉ. गुट्टे यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी स्मशानभूमी संदर्भात चर्चा केली होती. म्हणून ग्रामस्थांच्या विनंतीवरून उपोषणकर्त्यांनी त्यांचे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. डॉ. गुट्टे यांनी उपसरपंच सदाशिव लांडे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर हनवते, राहुल आवरगंड, भास्कर लांडे यांना लिंबूपाणी देऊन उपोषण मागे घेतले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप आळनुरे पाटील, गुट्टे काका मित्र मंडळाचे पालम व पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, तालुकाध्यक्ष नारायण दुधाटे, युवा तालुकाध्यक्ष भगवान शिरस्कर, चंद्रकांत गायकवाड ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल कदम, बालाजी दुधाटे, कृष्णा बचाटे, तलाठी श्री गोरे, ग्रामसेवक श्री तांदळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. रामराव लांडे यांनी आभार मानले. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo : भावनिक क्षण! ख्रिस्तियानो रोनाल्डो रडला... मैदानावर एकटा उभा राहिला; फुटबॉलविश्व स्तब्ध Video

Portugal vs Spain : स्वप्न तुटले! ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वर्ल्ड कप प्रवास संपला! पोर्तुगालला माजी विजेत्या स्पेनकडून पराभवाचा धक्का

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

LPG import updates: 'एलपीजी'बाबत सरकारने प्लॅन बदलला! अमेरिकेसोबत मोठा निर्णय, गॅसचं संकट टळणार

Pune Heavy Rain : पावसाने दाणादाण! जनजीवन विस्कळित, घरांसह दुकानांमध्ये शिरले पाणी

SCROLL FOR NEXT