MLA Kailas Ghadge has demanded Chief Minister Uddhav Thackeray to resolve the issue of Osmanabad-Solapur railway line..jpg 
मराठवाडा

उस्मानाबाद-सोलापूर रेल्वेमार्गाचा प्रश्न सोडवा, आमदार घाडगे यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी

तानाजी जाधववर

उस्मानाबाद : उस्मानाबाद - तुळजापुर - सोलापुर रेल्वे मार्गाबाबत केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याची बाब शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमोर मांडली. त्यासाठी राज्याच्या वाट्याचा हिस्सा उचलून हा मार्ग तातडीने पूर्ण करण्याची मागणी केल्याचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी म्हटले आहे.
  
मराठवाड्यासह जिल्ह्याच्या प्रलंबित विषयाच्या बाबतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी (ता.एक) रोजी बैठक घेतली. बैठकीमध्ये कृष्णा-मराठवाडा प्रकल्प, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माती, स्वतंत्र विद्यापीठ निर्मीती, औद्यागिक वसाहतीचा विकास व तुळजापुर तिर्थक्षेत्र रेल्वेने जोडण्याच्या विषयावर प्राधान्याने चर्चा करण्यात आल्याची माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिली. बैठकीला आमदार प्रा.तानाजी सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती होती. 

तुळजापूरला तीर्थक्षेत्र म्हणून देशाच्या नकाशावर आणण्यासाठी रेल्वेने जोडणे आवश्यक आहे. हा रेल्वेमार्ग मंजूर असला तरी केंद्राकडून या कामाबाबत म्हणावी अशी गती मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यासाठी राज्यसरकारकडून हिस्सा घालून हा मार्ग तातडीने पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली. कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्ताव नियामक मंडळाच्या 73 व्या बैठकीत मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी शिफारस करण्याचा ठराव मंजुर आहे. त्यानुसार मंत्रीमंडळ बैठकीत प्रकल्पास द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यतेबाबतचा निर्णय होण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

उपसा सिंचन योजना क्रमांक एक अंतर्गत दुधाळवाडी साठवण तलाव व उपसा सिंचन योजना क्रमांक दोन रामदरा साठवण तलाव पर्यंतच्या कामाच्या फेरनियोजनाचा प्रस्ताव तीन ऑगस्टच्या महामंडळाच्या पत्रानुसार शासनास सादर करण्यात आले आहे. त्यानुंषगाने फेरनियोजनाच्या प्रस्तावास तत्काळ मान्यता देण्याची मागणी यावेळी करण्यात आल्याचे आमदार घाडगे पाटील यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंत्रीमहोदयाच्या ऑगस्टमध्ये बैठकीत ठरल्याप्रमाणे मंत्रीमंडळासमोर ठेऊन तो मंजूर करण्यात यावा, अशीही मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली.

विद्यापीठाबाबतही एक बैठक ऑगस्टमध्ये पार पडली होती, त्या बैठकीत एका समितीची घोषणा करण्यात आली होती. तिचे गठन होऊन त्या समितीकडून तत्काळ अहवाल मागवून  घेण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. कौडगाव एमआयडीसीमध्ये भेल प्रकल्पाव्यतिरिक्त नवीन उद्योग येण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक उद्योगांनाही प्राधान्य देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

वडगाव (सि) येथील औद्योगिक वसाहतीसाठी भुसंपादन केलेल्या शेतकऱ्यांचा मावेजा रुपये 43 कोटी रुपये तातडीने वितरीत करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबतही चर्चा झाल्याचे आमदार घाडगे पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याबाबत सकारात्मक असल्याचे सांगून सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपस्थित लोकप्रतिनिधीना दिल्याची माहिती आमदार घाडगे पाटील यांनी दिली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT