file photo 
मराठवाडा

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आमदार सुरेश वरपुडकर; तर उपाध्यक्षपदी राजेश पाटील गोरेगावकर

गणेश पांडे

परभणी ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुरेश वरपुडकर यांची तर उपाध्यक्षपदी राजेश पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली. मंगळवारी (ता. सहा) या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी मंगळवारी (ता. सहा) जिल्हा बँक सभागृहात सकाळी 11 वाजता नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यास नवनिर्वाचित ज्येष्ठ संचालकांसह अन्य उपस्थित होते. सकाळी अकरा वाजता अध्यक्ष- उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करावयास सुरवात झाली. त्यावेळी आमदार सुरेश वरपुडकर व त्यांच्या स्नुषा प्रेरणा वरपुडकर या दोघांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर उपाध्यक्षपदासाठी औंढा नागनाथ सहकारी संस्था गटातील नवनिर्वाचित सदस्य राजेश पाटील गोरेगावकर यांन अर्ज दाखल केला. या दोन्ही पदासाठी अन्य कोणाचेही अर्ज आले नव्हते. छानणी प्रक्रियेतून हे अर्ज वैध ठरल्यानंतर प्रेरणा वरपुडकर यांनी अध्यक्षपदासाठीचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे अध्यक्षपदी आमदार सुरेश वरपुडकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यापाठोपाठ दुपारी एक वाजता उपाध्यक्षपदी राजेश पाटील गोरेगावकर यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केली.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदाच्या निवडीच्यावेळी बॅंकेच्या आवारात चोख पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. जिल्हा बॅंकेचे अधिकारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी व संचालक यांच्या शिवाय अन्य कुणालाही बॅंकेत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला होता. बॅंकेच्या परिसरातील दोन्ही मुख्य गेट बंद करण्यात आले होते. संपूर्ण बॅंक आवारात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT