मराठवाडा

आमदारांनी मागविली बैलगाडी अन् त्यात बसून जिल्हाधिकारी मुगळीकरांची पाहणी  

मारोती नाईकवाडे

पालम ः गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार उडविला असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालम तालुक्यात अनेक गावात नुकसानीचा आकडा मोठा आहे. सलग दोन दिवसांपासून गंगाखेड विधानसभा मतदाससंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी या तालुक्यात दौरा केला. रविवारी (ता.२७) त्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकरांना सोबत घेवून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी रस्ता नसल्याने वाहन जात नसल्याने आमदार रत्नाकर गुट्टे यांनी बैलगाडी मागवून घेतली. या वेळी बैलगाडीत आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह जिल्हाधिकारी मुगळीकरांनी देखील बसून शेताच्या बांधावर जात पाहणी केली.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा पालम तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला आहे. नदी नाल्यांना आलेल्या पुरानेही शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. यामध्ये कापूस, सोयाबीन व उस या पिकांची मोठी नासाडी झाली आहे. 

तत्काळ नुकसान भरपाई मिळावी

शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार रत्नाकर गुट्टे आग्रही आहेत. राज्यस्तरावरून पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. रविवारी (ता.२७) रोजी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी पालम तालुक्यातील रावराजुर, रोकडेवाडी, केरवाडी, पालम आदी गावातील नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी दौरा केला. या दौऱ्यात त्यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार ज्योती चव्हाण, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप अळनुरे, पालम पुर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष असदख पठाण, नगरसेवक संजय थिटे, शेख गौस, शिवराम पैके, चंद्रकांत गायकवाड राहुल शिंदे बाळासाहेब फूलपगार, नारायण झिलेवाड आदींसह पदाधिकारी उपस्थित हेाते. 

आमदार गुट्टे यांनी बैलगाडी मागवून घेतली
जिल्हाधिकाऱ्यांनी पालम तालुक्यातील रावराजुर, रोकडेवाडी, केरवाडी व पालम या गावच्या शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली. विशेष म्हणजे रावराजूर या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी वाहन जात नसल्याने आमदार रत्नाकर गुट्टे यांनी बैलगाडी मागवून घेतली. या बैलगाडीतून आमदार गुट्टे यांच्यासह जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली.

आमदार गुट्टेचा सलग दुसऱ्या दिवशीही दौरा
पालम तालुक्यात पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शनिवारी तालुक्यातील शेत शिवाराला भेटी दिल्या होत्या. भर पावसात त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. तालुक्यातील अडचण लक्षात घेता शनिवारी रात्रीच त्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी संपर्क साधून तालुक्याचा दौरा करावा अशी विनंती केली होती. त्यानंतर आज रविवारी परत आमदार गुट्टे हे पालमसह गंगाखेड तालुक्यातील काही गावांना भेटी देण्यासाठी पोहचले होते.

संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women’s Premier League: महिला प्रीमियर लीगचा धडाका आजपासून; डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये रंगणार पहिला टप्पा !

Tiger Reserve New Rules : आता वाघाचा फोटो काढणं पडणार महागात! ‘या’ व्याघ्र प्रकल्पाने लागू केले कडक निर्बंध, काय आहेत नवे नियम?

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत शिंदेंच्या शिंवसेनेला खिंडार

Flipkart Republic Day 2026 सेल या तारखेपासून होणार सुरु, आयफोनसह हे 5G फोन स्वस्तात करु शकाल खरेदी

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला ऑफिससाठी पारंपरिक लूक हवाय? काळ्या साड्यांचे हे ७ स्टायलिश पर्याय तुमच्यासाठी ठरतील परफेक्ट

SCROLL FOR NEXT