file photo
file photo 
मराठवाडा

युवतीशी चाळे करणाऱ्या ॲटोचालकास जमावाने धुतले

प्रल्हाद कांबळे

नांदेड : ॲटोत प्रवास करणाऱ्या एका युवतीला तीने सांगितलेल्या ठिकाणी न नेता दुसऱ्याच ठिकाणी नेऊन ॲटो चालकाने विनयभंग केला. यावेळी सतर्कता बाळगत तीने आपल्या आईला बोलावून घेतले मात्र तिच्या आईलाही त्यांने धक्काबूक्की केली. यानंतर मात्र जमावाने त्याला चांगलाच चोपला. ही घटना मंगळवारी (ता. तीन) दुपारी तीनच्या सुमारास गुरूजी चौक, पूर्णा रोड येथे घडली.

शहराच्या विशालनगर भागात राहणारी एक युवती छत्रपती चौक येथून विशालनगर येथे जाण्यासाठी ॲटोत बसली. मात्र ॲटोचालक श्रीकांत बाबूराव सोनकांबळे याने तीन सांगितलेल्या ठिकाणी ॲटो न नेता रस्त्यात वळवून गुरूजी चौकात नेला. तिथे गेल्यानंतर त्याने तिचा अश्‍लिल भाषेत बोलून विनयभंग केला. परंतु पीडीत युवतीने आपल्या आईला फोनवरून संपर्क साधला. यावेळी आईने धावाधाव करत गुरूजी चौक गाठले. 

तिच्या आईलाही धक्काबुक्की, जमावाकडून चोप

यावेळी ॲटोचालक श्रीकांतने तिच्या आईलाही धक्काबुक्की केली. यानंतर मात्र तिथे जमा झालेल्या जमावाने ॲटोचालकास चांगलाच चोप देत भाग्यनगर पोलिसांंच्या स्वाधीन केले. पिडीत युवतीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अपहरण, विनयभंग व शिवीगाळ केल्याप्रकरणी श्रीकांत सोनकांबळेविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास फौजदार एस. के. नरवाडे करत आहेत. 

गळफास घेऊन एकाचा मृत्यू 

नांदेड : रागाच्या भरात एकाने सागाच्या झाडाला गळफसा घेऊन आत्‍महत्या केली. ही घटना शेळगाव थडी (ता. बिलोली) शिवारात मंगळवारी (ता. तीन) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. 

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेळगाव थडी (ता. बिलोली) शिवारात सागाच्या झाडाला गळफास घेतलेला मृतदेह असल्याची माहिती मिळाली. यावरून कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार श्री. इंगळे हे आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी गेले. पंचानामा केल्यानंतर मयत विठ्ठल बाबूराव इजूलकुंटे हा बेळकोणी बु. (ता. बिलोली) येथील रहिवाशी असल्याचे समजले. त्याच्या नातेवाईकांना माहिती देऊन उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह बिलोलीच्या सरकारी रुग्णालयात दाखल केला. बाबूराव इजुलकुंटे यांच्या माहितीवरून कुंडलवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT