फोटो 
मराठवाडा

मोबाईल चोरांची टोळी जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहरात व परिसरात दुचाकीसह मोबाईल चोरी करून पोलिसांना गुंगारा देणारी टोळी अखेर शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानी (डीबी) अटक केली. त्यांच्याकडून सात मोबाईल व एक दुचाकी असा दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (ता. २९) रोजी केली. 

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी व मोबाईल चोरांनी डोके वर काढले. आठवडी बाजार व गर्दीच्या ठिकाणी सावध असलेल्या व्यक्तीचे मोबाईल किंवा दुचाकी पळविण्याच्या घटना घडल्याने पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. वाढत्या घटना लक्षात घेता पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच शिवाजीनगर पोलिसांना सुचना दिल्या. 

तिघांना अटक, पोलिस कोठडी

पोलिस उपाधिक्षक (शहर) अभिजीत फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे यांना सांगितले. श्री. वाहूळे यांनी आपल्या पथकासोबत रविवारी (ता. २९) रात्री गस्त घालत असतांना मोबाईल चोरांच्या टोळीला अटक केली. त्यात रोहीत उर्फ चिक्या सुभाष मांजरमकर (वय १९) रा. पौर्णिमानगर, गजानन उर्फ गजा किशन देवकांबळे (वय १९) रा. हनुमान गड आणि राहूल नागनाथ काळे (वय १९) रा. खोब्रागडेनगर, नांदेड यांचा सहभाग आहे. त्यांच्याकडून ८४ हजाराचे विविध कंपनीचे सात मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली ७० हजाराची दुचाकी असा एक लाख ५४ हजार रुपयाचा मुद्मेमाल जप्त केला. 
शिवाजीनगर पोलिसांनी या तिन्ही आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता मंगळवार (ता. ३१) डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे.  या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार श्री. गोटमवाड करीत आहेत. 

हे उघडून तर पहा---घोरपडीने शेपुट मारल्यास...

अल्पवयीन चोरटे मोबाईल चोरीत

नांदेड शहरात मागी काही दिवसापासून अल्पवयीन चोरटे मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात सापडत आहेत. त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस यंत्रणेचे काही अधिकार कमी पडत आहेत. त्यामुळे पकडल्या गेलेले हे अल्पवयीन चोरट्याने बालन्यायालय लगेच सोडून देत आहेत. हे चोरटे पुन्हा पोलिस आपले काहीच करु शकत नसल्याने ते पुन्हा असे गुन्हे करत आहेत. तसेच काही तर चक्क शौकासाठी दुसऱ्याची दुचाकी पळविणारी टोळीही सक्रीय झाली आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे एवढ्या किंमतीचा मोबाईल किंवा दुचाकी कोणाची आहे याची विचारपूस करणे आवश्‍यक आहे. त्याच्या मित्रांची माहिती काढून मित्र नेमके काय करतात याची चाचपणी पालकांनी करावी. तसेच गुन्हगार प्रवृत्तीच्या युवकासोबत आपला पाल्य फिरत असले तर त्याला समज द्यावी.
- विजयकुमार मगर, पोलिस अधिक्षक, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT