file photo 
मराठवाडा

`नाक’ फोडून मोबाईल लंपास

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शिक्षणासाठी आलेल्या एका विद्यार्थ्यास चाकुचा धाक दाखवून पंचने `नाक’ फोडून त्याचा चार हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरीने चोरुन नेला. ही घटना शनिवारी (ता. २१) रात्री आठच्या सुमारास व्हीआयपी रस्त्यावरील बिसेननगर कमानीसमोर घडली. 

बाहेर जिल्ह्यातील गजानन धर्मा कुडमात (वय २९) हा शिक्षण घेण्यासाठी नांदेडच्या विष्णुनगर भागात असलेल्या आदिवासी वसतीगृहात राहतो. वसतीगृहात भोजन करून तो सहज वसतीगृहाच्या बाहेर फेरफटका मारण्यासाठी गेला होता. व्हीआयपी रस्‍त्यावरील बिसेनसिंहनगर कमानीजवळ तो विष्णुनगरकडे जात होता. यावेळी त्याला एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी अडविले. त्यांनी त्याला मोबाईल व तुझ्याकडे जे काही आहे ते दे असे म्हणताच त्याने त्यांना विरोध केला. यावेळी चोरटांनी त्याला मारहाण केली. तसेच चाकुचा धाक दाखवून एकाने पंचने गजानन कुडमात याच्या नाकावर मारून त्याचे नाक फोडले. यावेळी त्याच्या खिशातील चार हजार रुपये किमंतीचा रेडमीनोट- ३ कंपनीचा मोबाईल जबरीने चोरून घेऊन पसार झाले. 

अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल 

नाकाला जबर मार लागल्याने त्याला चक्कर आली. त्याच अवस्थेत नाकाला धरून तो कसाबसा वसतीगृहावर पोहचला. त्याच्या मित्रांनी त्याला लगेच रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर गजानन कुडमात याने रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. त्याच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अनोळखी दोन चोरट्यांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार श्रीमती कदम करीत आहेत. 

शिवाजीनगर ठाण्याची ‘डीबी’ नावालाच : 

नांदेड शहर हे शिक्षणाचा हब बनत चालले आहे. या ठिकाणी वैद्यकीय व अभियांत्रीकी आणि इंजिनियरींगच्या शिक्षणासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी वास्तव्यास आहेत. खासगी शिकवणी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरातील टवाळखोरांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालक वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथक (डीबी) फक्त नावालाच असल्याने हद्दीतील एकही पाकिटमार किंवा मोबाईल चोर या पथकाच्या हाती लागत नाही. त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढून ते विद्यार्थ्यांना टार्गेट करीत असल्याचे वाढत्या घटनांवरून दिसून येते. या टवाळखोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी पालक वर्गातून करण्यात येत आहे. सेच या बाबीकडे पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT