file photo
file photo 
मराठवाडा

रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात मोबाईल चोरटा 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : रेल्वे प्रवाशांच्या नजरा चुकवून किंवा बेसावध असल्याचे पाहून मोबाईल, पर्स किंवा किंमती सामान चोरीच्या घटना वाढत आहेत. या घटनांवर नियंत्रण मिळावे यासाठी लोहमार्ग पोलिस रेल्वेत गस्त घालतात. परंतु त्यांनाही मामा बनवत हे चोरटे आपले काळे कारनामे करतात. असाच एक चोरटा पोलिसांनी अटक केला. त्याच्याकडून सव्वालाखाचे विविध कंपनीचे १५ मोबाईल जप्त केले. औरंगाबाद येथील लोहमार्ग न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत पाठविले आहे.
 
हजुर साहेब नांदेड, पूर्णा, परभणी, मुदखेड, किनवट, भोकर, धर्माबाद, उमरी या स्थानकावर चोरट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. नांदेडच्या रेल्वेस्थानक परिसराच्या बाहेर काही युवक एखाद्या बंद पडलेल्या ॲटोत बसुन राहतात. एखादी ग्रामिण भागातील वृध्द आला तर त्याला मारहाण करून त्याच्याकडील पैसे लुटतात. परंतु लोहमार्ग पोलिस ठाण्यात गेल्यानंतर अनेकांना न्याय मिळत नाही. त्यामुळे अनेकजण आपल्या घरचा रस्ता धरतात. लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागते. गुन्हा कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी घडलेला असतो. मात्र संबंधीतांना काही अंतरावर गेल्यानंतर समजते. रेल्वेतील चोरट्यांना शोधणे अवघड आहे. 

आरोपीला मोबाईलसह अटक

मात्र लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहूल गायकवाड यांनी मागील काही दिवसांपासून आपल्या सहकाऱ्यांची गस्त वाढवून आपल्या हद्दीतील गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. 
मागील आठवड्यात गगनदीप हरिराम सोमी यांची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार एम. बी. पराळे यांच्याकडे देण्यात आला. फौजदार श्री. कदम यांनी श्री. पराळे व जीवराज लव्हारे आणि महाजन यांना सोबत घेऊन गस्त घालण्यास सुरवात केली. यावेळी त्यांनी त्यांनी सोमवारी (ता. २०) जानेवारी रोजी सकाळी भिकाजी उर्फ मंगेश गणपत गव्हाणे (वय ४०) रा. भगवाननगर तरोडानाका नांदेड याला ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता त्याने रेल्वेतील प्रवाशांचे मोबाईल चोरीची कबूली दिली. त्याच्याकडून विविध ठिकाणी चोरलेले एक लाख ११ हजार ३०० रुपयाचे किंमती १५ मोबाईल जप्त केले. त्याला श्री. पराळे यांनी औरंगाबाद लोहमार्ग न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT