उषा गाेरे 
मराठवाडा

वडिलांच्या जाण्याचे दुःख पचवून तिने आईचे केले अवयवदान, तिघांना मिळाले जीवदान 

याेगेश पायघन

औरंगाबाद - भीषण अपघातात वडील गेले. त्यात गंभीर जखमी झालेल्या आईच्याही मेंदूचे कार्य थांबले. त्यांना डॉक्‍टरांनी "ब्रेन डेड' घोषित केले. अशा कठीण समयी कोणताही माणूस कोलमडून पडल्याशिवाय राहणार नाही. पण आभाळाएवढ्या दुःखातही तिने स्वतःला सावरले अन्‌ एवढेच नव्हे, तर आईचे अवयवदान करून तिघांना जीवदानही दिले. पोरकेपणाचे दुःख बाजूला सारून एकोणीसवर्षीय मुलीने दाखविलेल्या या धीरोदात्त औदार्याला तोड नाही. 

गणोरी (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील जिल्हा परिषद प्रशालेतील प्राथमिक शिक्षक सूर्यभान गोरे, त्यांची पत्नी उषाबाई (वय 40) (रा. घोडेगाव, ह. मु. एस. टी. कॉलनी जाधववाडी), सहकारी शिक्षक हरिभाऊ सोनवणे, त्यांच्या पत्नी कांताबाई हे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शुक्रवारी शेगाव येथे निघाले होते. मात्र, अलीकडेच अंत्रज फाट्याजवळ 23 ऑगस्टला सकाळी कारचालक राजेंद्र वैष्णव यांचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली. या अपघातात शिक्षक हरिभाऊ सोनवणे व सूर्यभान गोरे यांचा जागीच तर चालक राजेंद्र वैष्णव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, सूर्यभान गोरे यांच्या पत्नी उषाबाई अत्यवस्थ असल्याने त्यांना जे जे प्लस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती बिघडल्याने उषाबाई यांना सिग्मा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले; परंतु त्यांच्या मेंदूचे कार्य थांबले. डॉक्‍टरांनी त्यांना "ब्रेन डेड' घोषित केले. अशा कठीण परिस्थितीतही सूर्यभान गोरे यांची एकोणीस वर्षांची मुलगी शिवानी डगमगली नाही. 

पाच दिवसांपूर्वीच या अपघातात वडिलांना गमावलेल्या शिवानीने मंगळवारी (ता.27) आईच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानंतर ऍप्निया टेस्ट झाल्यावर आईला रीतसर मेंदुमृत घोषित करण्यात आले. सकाळी अकरापासून अवयव रिट्रायव्हल सुरू झाले. दोन किडनी व लिव्हरचे रिट्रायव्हल करण्यात आले. दरम्यान, सिग्मा हॉस्पिटलमध्ये महिलेला एक किडनी व डॉक्‍टरवर लिव्हर प्रत्यारोपण रात्री दहापर्यंत सुरू होते. दुसरी किडनी कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये महिलेवर प्रत्यारोपण करण्यात आली. त्यानंतर उषाबाई यांच्यावर खुलताबाद जवळच्या घोडेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सूर्यभान गोरे (रा. घोडेगाव ता. खुलताबाद) हे वर्ष 1985-86 मध्ये मेरिटचे विद्यार्थी होते. त्यानंतर इंग्रजी आणि गणित विषयांचे तज्ज्ञ शिक्षक बनले. पारंपरिक कुंभार व्यवसाय करणाऱ्या आई-वडिलांच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले होते. गावातील कुंभार समाजातील ते पहिले शिक्षक होते. सूर्यभान यांचे वडील कान्हू हे दुर्धर आजाराने ग्रस्त असून, आईही वयोवृद्ध आहे. शांत स्वभावाच्या उषाबाई कायम सर्वांना सहकार्य करायच्या, असे साईनाथ जाधव यांनी सांगितले. 
शिवानीला एक मोठा भाऊ शुभम (वय 22) आहे. तो भोळसर आहे. त्यामुळे शिवानीच आता घराची कर्ती बनली आहे. 

मराठवाड्यातील 25 वे अवयवदान 
मराठवाड्यातील हे 25 वे अवयवदान ठरले. तर या वर्षातील हे तिसरे अवयवदान होते. आजपर्यंत एकूण 104 अवयवांचे दान मिळाले असून, त्याचे यशस्वी प्रत्यारोपण झाले. यात 10 हृदय, 22 यकृत, 47 मूत्रपिंड, तर 28 बुब्बुळांचा समावेश आहे. 25 व्या अवयवदान व प्रत्यारोपणात डॉ. उन्मेश टाकळकर, डॉ. विक्रम राऊत, डॉ. अजय रोटे, डॉ. अभय महाजन, डॉ. अरुण चिंचोले, डॉ. सचिन सोनी, डॉ. श्रीगणेश बर्नेला, भूलतज्ज्ञ डॉ. प्रमोद अपसिंगेकर, डॉ. बालाजी आसेगावकर यांच्या टीमने काम केले. मनोज गाडेकर, मनोज बरसाळे, भारत जाधव, संदीप चव्हाण यांनी अवयदानाच्या प्रक्रियेत समन्वयाचे काम केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

B Sudarshan Reddy reaction : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर बी. सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

SCROLL FOR NEXT