जिंतूर आॅक्सीजन सिलेंडर 
मराठवाडा

Motivational Story : जिंतूर रुग्णालयाला स्व: खर्चातून दहा ऑक्सिजन सिलेंडरची मदत

तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढीसोबतच रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे.

राजभाऊ नगरकर

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना तसेच येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये (Trama care center) उपचार घेत असलेल्या रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन (oxygen) उपलब्ध व्हावे यासाठी गणेश काजळे यांनी स्वखर्चाने शहरातील ग्रामीण रुग्णालयात भरलेले जंबो १० ऑक्सिजन सिलेंडर सोमवारी (ता. १७) तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या हस्ते भेट स्वरुपात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.

तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढीसोबतच रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. या आजारात रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होत असते अशावेळी रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते. परंतु ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे तालुक्यातील रुग्णांना इतरत्र पाठवावे लागते. त्यात वेळ जात असल्याने प्रसंगी रुग्णाच्या जीवावर बेतले जाई. अशा परिस्थितीत जागेवरच ऑक्सिजन उपलब्ध व्हावे या सद्हेतूने सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेऊन सर्वसामान्य नागरिकांसाठी झटणारे गणेश काजळे यांनी स्वखर्चाने ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर हा उपक्रम राबवित तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या हस्ते रुग्णालयास ऑक्सिजनचे दहा सिलेंडर भेट देण्यात आले.

हेही वाचा - पुणे शहरातील कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसू लागले

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकिरण चांडगे, डॉ. अनिफ खान, मंडळ अधिकारी प्रशांत राखे, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब काजळे व ट्रामा केअर सेंटरमधील आरोग्य कर्मचारी यांची उपस्थिती होती तर गणेश काजळे मित्र मंडळाचे भागवत कापुरे, राम पाटील, दामोदर घुगे, राजाभाऊ काजळे, विशाल दहिवाल, वैभव काजळे आदी पदाधिकारी यांची उपस्थित होते. सामाजिक जीवन जगत असतात. आपणही समाजाचे काहीतरी देणे लावतो. या उद्देशाने तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचे सिलेंडर देण्यात आले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC CAPF Success Story: एक एकर शेती, शेतमजुरी अन् जिद्दीच्या जोरावर UPSC CAPF मध्ये २७९ वा क्रमांक; प्रवीण स्वामींची यशोगाथा..

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Kas Plateau Flower Festival : कास पठारावरील फुले पाहण्यासाठी आता 200 रुपये शुल्क; पठारावर जाण्यापूर्वी जाणून घ्या Online Booking ची सोपी पद्धत

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

SCROLL FOR NEXT