Shiv Jayanti Celebration  esakal
मराठवाडा

उत्तराखंडामध्ये १५ हजार फुट उंच हिम शिखरावरून शिवरायांना अभिवादन

तरूण गिर्यारोहकांनी सहभाग नोंदवत शिवजयंती उत्साहात साजरी केली.

गणेश पांडे

परभणी : उत्तराखंडमधील पांगरचुला व तुंगनाथ या दोन हिमपर्वतावर भारतातील विविध राज्यातून एकत्र येत तरूण शिवप्रेमी गिर्यारोहकांनी १५ हजार फूट उंच हिमशिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त शिवघोषणा देत अभिवादन केले व उत्साहात शिवजयंती (Shiv Jayanti) साजरी केली. दिल्ली येथील तरूण राहुल शर्मा या गिर्यारोहकाने उत्तराखंडमधील पांगरचूला व तुंगनाथ येथे या हिवाळी मोहिमेची योजना आखली. हैदराबाद येथील हर्षादित्य बिजापुरी व परभणीचे रणजित कारेगावकर यांनी १९ फेब्रुवारी रोजी पांगरचुला व तुंगनाथ या हिमपर्वतावर शिवजयंती साजरी करायची ठरवले. १८ फेब्रुवारी रोजी तुगासी या गावातून गिर्यारोहणास सुरूवात झाली. (Mountaineers Celebrate Shiv Jayant At Ice Mountain, Three Parbhani Youths Participate)

सर्व गिर्यारोहकांनी सायंकाळी खुलारा येथे उणे १५ अंश तापमानात हिमपर्वतावरील बेसकॅम्पवर मुक्काम केला. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता सर्व गिर्यारोहक खुलाराहून पांगरचुला हिमपर्वत सर करण्यास रवाना झाले. सकाळी दहा वाजता शिखरावर जाऊन शिवप्रतिमा असलेले ध्वज फडकवून 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' चा जयघोष करत सर्वांनी शिवरायांना अभिवादन केले. तेलगू भाषिक हर्षादित्य बिजापुरी यांनी शिवस्तुतीपर मराठी घोषणा गाऊन एक वेगळा रोमांच निर्माण केला. दुसऱ्या दिवशी २० फेब्रुवारी रोजी जगातील सर्वांत उंच शिवमंदिर असलेल्या तुंगनाथ येथेही गिर्यारोहन करून शिवघोषणा देत या गिर्यारोहकांनी शिवजयंती साजरी केली.

मोहिमेत यांचा सहभाग

परभणीचे (Parbhani) सहायक निबंधक माधव यादव, रणजित कारेगावकर, विष्णू मेहेत्रे, प्रदीप धर्मशेट्टी, राजस्थान येथील संदीप सैनी, उत्तराखंड गढवाल येथील रोहित शर्मा, दिल्ली येथील राहुल शर्मा, विष्णू सिंग, उत्तराखंड काशीपुरची काजल गुप्ता, तेलंगणाचे हर्षादित्य बिजापुरी, डॉ. श्रीकांत व डॉ. उदयकुमार, स्थानिक गाईड सुनिल सिंग आदी तरूण गिर्यारोहकांनी सहभाग नोंदवत शिवजयंती उत्साहात साजरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

SCROLL FOR NEXT