फोटो 
मराठवाडा

परभणीत वकीलांचे आरटीओ कार्यालयात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयातील एका लिपिकाने कार्यालयात कामानिमित्त आलेले वकीलांना उध्दट भाषा वापरून अपमानीत केले, असा आरोप करीत शेकडो वकीलांनी शनिवारी (ता.21) उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात येऊन घटनेचा निषेध केला. या वेळी संपप्त वकीलांनी आरटीओंच्या खर्चीलाच तक्रार निवेदनाची कॉपी चिटकवून आपला रोष व्यक्त केला.


परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येथील वकील अॅड. प्रमोद अंधारे हे शनिवारी (ता.२१) एका अन्य व्यक्तीसोबत मोटारसायकलच्या कर्जाचे तारण बोजा करण्यासाठी आले होते. त्यांनी त्यांची कागदपत्रे तेथील लिपिक पी. एन. कराळे यांच्याकडे सुपूर्द करून काम तातडीने करण्याची विनंती केली. परंतू, या कामावरून अॅड. प्रमोद अंधारे व लिपिक पी. एन कराळे यांच्यात वाद झाला. या वादात लिपिक पी. एन. कराळे यांनी आपल्याला अपशब्द काढून अपमानीत केले तसेच आपल्या व्यवसायाबद्दल देखील अपशब्द काढून वकीली पेशाचा अपमान केला असा आरोप अॅड. श्री. अंधारे यांनी केला.

आरटीओ कार्यालयात जमाव
या घटनेनंतर वकील संघातील शेकडो वकील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात गोळा झाले. त्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. या वेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे वकिलांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीलाच तक्रार निवेदनाची कॉपी चिटकवली. या तक्रार निवेदनात लिपिक पी. एन. कराळे यांना निलंबित करावे, अशी मागणी या वेळी वकीलांनी केली.

जिल्हाधिकाऱ्यांनाही दिले निवेदन
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील आंदोलन करून वकील मंडळी परत जिल्हाधिकारी कार्यालयात गेली. या ठिकाणी जिल्हा वकील संघाच्यावतीने घटनेचा निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारीचे निवेदन देण्यात आले.

येथे क्लीक करा--हातकडीसह आरोपी फरार, पोलिसांना बलविले मामा ​

जाहिर माफी मागावी


उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिक पी. एन. कराळे यांनी आमच्या वकीली पेशा विषयी अपमानीत करणारे विधान केले आहे. याची त्यांनी जाहिर माफी मागावी व प्रशासनाने त्यांना निलंबीत करावे अशी आमची मागणी आहे.
अॅड. प्रमोद अंधारे., परभणी

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT