file photo 
मराठवाडा

Video :  बंधपत्रित परिचारिकांचा ‘आत्मक्लेश’

गणेश पांडे

परभणी : बंधपात्रित अधिपरिचारिकांना सेवेत कायम करून घ्यावे, या इतर मागण्यांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील बंधपत्रित परिचारिकांनी एक दिवसाचे सोमवारी (ता. आठ) आत्मक्लेश आंदोलन केले.
बंधपत्रित परिचारिकांच्या सेवा नियमित करण्यासाठी २००८ ते आजतागायत शासन स्तरावर वारंवार चालू आहे. मात्र, आरोग्य खात्यातील काही अधिकाऱ्यामुळे परिचारिकांमध्ये दुही निर्माण केली आहे. २००० ते २०१५ पर्यंतच्या परिचारिकांच्या सेवा नियमित करण्यात आल्या. एप्रिल २०१५ च्या नंतरच्या परिचारिकांना थेट घरचा रस्ता दाखविण्याचे षङयंत्र आरोग्य सेवा संचालनालय व आरोग्य मंत्रालयामधील काही मनमानी कारभार करणाऱ्या नोकरशाहाकडूंन केले जात आहे, असा आरोप यावेळी या परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

एकत्र जमून आंदोलना सुरवात

ता. १५ एप्रिल २०१५ नंतरच्या बंधपत्रित अधिपरिचारिकांना सेवेत कायम करावे, २५ ह जार मानधनाचा शासन निर्णय रद्द करून सातव्या वेतनानुसार देण्यात यावे, १७९ दिवसांची ऑर्डर रद्द करून ११ महिन्यांची देण्यात यावी, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर ता. आठ जून रोजी एक दिवसाचे काम बंद आंदोलन करण्याच निर्धार केला आहे. या संघटनेला महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा परभणी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या परिचारिकांनी  सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासमोर एकत्र जमून आंदोलना सुरवात केली. यावेळी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या जिल्हाध्यक्षा मीना देशमुख, सचिव अमोलकुमार कवाने यांच्यासह बंधपत्रित अधिपरिचारिका साईनाथ पांचाळ, अर्जुन मुंढे, मीना वाघमारे, सपना साळवे, मनीषा माने, सुवर्णा नाईकनवरे, अजिंक्य दीपके, अनुजा नरवाडे यांच्यासह इतर परिचारिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

जिल्हा शल्चचिकित्सकांची आंदोलकांना भेट
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी आंदोलक परिचारिकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. या मागण्यांसाठी आपण निश्चित वरिष्ठांशी चर्चा करून मार्ग काढू, असे आश्वासन त्यांनी दिले.

सोडवूण झाली पाहिजे
बंध परिचारिकांच्या मागण्या योग्य असून शासन स्तरावर त्यांची सोडवूण झाली पाहिजे. यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनाही प्रयत्न करणार आहे.
- मीना देशमुख, जिल्हाध्यक्ष परिचारिका संघटना
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

America-Israel: ट्रम्प-नेतान्याहूंमध्ये खडाजंगी? युद्धाच्या धोरणावरून मतभेद; अमेरिकेतील माध्यमांचे वृत्त

Bakrid Sacrifice Rule: गायीची कुर्बानी अनिवार्य नाही, बकरीदपूर्वी हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; धार्मिक परंपरेबाबत स्पष्ट भूमिका

SCROLL FOR NEXT