file photo 
मराठवाडा

Video: खुर्चीला चपलांचा हार

सकाळ वृत्तसेवा

परभणी : जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त फळबागांचे पंचनामे करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता.पाच) जिल्हा कृषी अधीक्षकांच्या खुर्चीला चपलांचा हार घालत संत्रे टेबलावर फेकुन दिले.

जिल्ह्यात रविवारी (ता.एक) रात्री अवकाळी पाऊस झाला. त्यामध्ये रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. जांब आणि मांडाखळी, पेडगाव (ता.परभणी) शिवारात झालेल्या नुकसानीच्या तक्रारी कृषि विभागास दिल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे.अनेक शेतकऱ्यांनी फळपिक विमा भरलेला आहे. त्यामुळे कृषि विभाग व विमा कंपनीने या तक्रारीची दखल घेऊन पंचनामे करणे आपेक्षीत असताना अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

पडलेले​ संत्रे फेकली टेबलावर 
या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करत बुधवारी (ता.पाच) स्वाभीमानी शेतकरी संघटनेने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात जात आंदोलन केले. या वेळी कृषी अधीक्षक संतोष आळसे हे कार्यालयात हजर नव्हते. आंदोलनकर्त्यांनीसोबत आणलेला चपलांचा हार जिल्हा कृषी अधीक्षकांच्या खुर्चीला घातला. तसेच पावसामुळे पडलेले संत्रे टेबल आणि कार्यालयात फेकुन दिले. या वेळी घोषणाबाजी करत तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनात जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटिंग, मुंजाजी लोडे, केशव आरमळ, उस्मान पठाण आदीं सहभागी झाले होते.


हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव
सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात असून तूर पिकाची काढणी सुरू आहे. तर ज्वारी पोटऱ्यात आली आहे. गहूदेखील वाढीला लागलेला आहे. अशा अवस्थेत वातावरण मात्र, सातत्याने बदलत आहे. ढगाळ वातावरण सातत्याने राहत असल्याने हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होत आहे. शेतकरी तूर काढत असताना पावसाने गोंधळ निर्माण केला आहे. रविवारी आलेल्या पावसामुळे कापणी करून ठेवलेली तूर भिजली आहे. पावसाचा पुन्हा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी सोमवारी कापणी केलेली तूर सुरक्षित ठिकाणी हलविण्याची घाई केल्याचे दिसून आले. बहुतांष ठिकाणी ज्वारीचे कणसे भरण्याची अवस्था आहे. अशा वेळी पाऊस होत असल्याने ज्वारी काळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच वारा आल्यास ज्वारी आडवी होण्याची भीती आहे. अनेक शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केलेल्या गव्हालादेखील फटका बसण्याची शक्यता आहे.

पंचनामे करा
कृषी विभाग फळपिक विमा कंपनीला पाठीशी घालत आहे. नुकसान होऊनही पंचनामे केले जात नसल्याने शेतकऱ्यांच्यावतीने संघटनेने संताप व्यक्त केला आहे. पंचनामे करा, अन्यथा पावसामुळे मोडलेली संत्रा, मोसंबीची झाडे कृषी कार्यालयात आणली जातील.
- किशोर ढगे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT