MP Bajrang Sonawane Criticized Amol Mitkari esakal
मराठवाडा

MP Bajrang Sonawane: बजरंगाच्या हृदयात अजूनही अजित पवारच आहेत का? सोनवणेंनी अजितदादांना खरंच संपर्क केला का? स्वतःच दिलं स्पष्टीकरण

MP Bajrang Sonawane Criticized Amol Mitkari: बजरंग सोनावणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता. त्यावर आज बजरंग सोनवणे यांनी अजित दादांच्या बंगल्यावरचे ऑपरेटर आहेत का? असा सवाल करत मिटकरी यांच्यावर पलटवार केला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलेल्या हाय होल्टेज बीज लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा जायन्ट किलर बजरंग सोनावणे यांनी पराभव केला होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर धनंजय मुंडे यांच्या निवकटवर्तीय असलेल्या सोनावणे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रावादीतून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच सोनावणे यांना बीडची उमेदवारी मिळाली होती.

आता लोकसभा निकाल लागून एक आठवडाही झाला नाही तोवर बजरंग सोनावणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता. त्यावर आज बजरंग सोनवणे यांनी अजित दादांच्या बंगल्यावरचे ऑपरेटर आहेत का? असा सवाल करत मिटकरी यांच्यावर पलटवार केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया एक्सवरती पोस्ट करत बजरंग सोनवणे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. हा दावा बजरंग सोनवणे यांनी फेटाळला होता. परंतु आता पुन्हा एकदा बजरंग सोनवणे यांनी अमोल मिटकरींवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले खासदार बजरंग सोनवणे?

बीड जिल्ह्याचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे बोलताना म्हणाले, अमोल मिटकरी हे कोण आहेत? ते अजित दादांच्या बंगल्यावर एखादे ऑपरेटर आहेत का? ते नेमके कोण आहेत? हे मला माहित नाही, त्यामुळं विचारलं पाहिजे ना अमोल मिटकरी हे कोण आहेत. दादांच्या बंगल्यावर कोणाचा फोन आला याचे रेकॉर्ड ऑपरेटरकडे असू शकतात, म्हणून मी म्हटलं मिटकरी ऑपरेटर आहेत का? असंही पुढे बजरंग सोनावणे म्हणाले आहेत.

शरद पवार गटाचे आठ खासदार निवडून आले आहेत. जर माझ्यासारखा एखादा खासदार इकडून निवडून येऊन तिकडे गेलाच, तर त्याला पब्लिक तर मारीनच माझ्या घरात माझे वडील पण मारतील, असं सोनवणे माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT