MP Hemant Patil join eknath shinde Sengaon Shiv Sena burnt MP symbolic effigy politics  sakal
मराठवाडा

खासदार हेमंत पाटील यांच्या बंडाचे सेनगावात पडसात शिवसेनेच्या वतीने खासदाराच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असलेले हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील देखील आता शिंदे गटात सामील

विठ्ठल देशमुख

सेनगाव (जि.हिंगोली) : कालपर्यंत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असलेले हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील देखील आता शिंदे गटात सामील झाल्यामुळे सेनगाव शहरात खासदार हेमंत पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा मंगळवारी ता. १९ जाळण्यात आला आहे. विधान परिषदेचे मतदान झाल्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करून तब्बल ४० आमदार फोडले. यानंतर त्यांनी धनुष्यबाण चिन्हासाठी १२ खासदाराचा गट देखील फोडला असून यामध्ये खा.हेमंत पाटील हे देखील शिंदे गटात सामील झाल्याची बातमी पसरली. यामुळे जिल्हाभरातून शिवसैनिकांतुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

बांगर पाठोपाठ काही दिवसातच खासदार हेमंत पाटील सुध्दा शिंदे गटाच्या बाजूने गेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एका पाठोपाठ होत असलेले बंड हे निष्ठावान शिवसैनिकांना मान्य नसल्यामुळे मंगळवारी सेनगाव येथील तहसील कार्यालयासमोर खासदार हेमंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसैनिकांकडून दहन करण्यात आहे. यावेळी रणजित देशमुख दिलीपराव कुंदरगे,जगदीश गाढवे तालुकाप्रमुख युवासेना,करण देशमुख,प्रविण महाजन,गंगाराम फटांगळे, दिगंबर देशमुख,निलेश राठोड,वसंता कुंदर्गे,फेरोज पठाण ,सचिन जाधव,विलास सुतार आदीसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT