Pritam Munde Sakal
मराठवाडा

MP Pritam Munde Video : कार्यक्रमात बोलताना प्रितम मुंडेंच्या डोळ्यात पाणी! गावकऱ्यांचीही मागितली माफी

ते एका सप्ताहाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

दत्ता लवांडे

बीड : बीडच्या खासदार प्रितम मुंडे एका कार्यक्रमात बोलत असताना भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. एका गावातील अखंड हरिनाम सप्ताहातील किर्तनाला त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी भक्तांशी आणि गावातील नागरिकांना बोलताना त्या भावूक झाल्या. त्याचबरोबर उपस्थित असलेल्या नागरिकांची माफीसुद्धा त्यांनी मागितली आहे.

काय म्हणाल्या प्रितम मुंडे?

"मी सर्वप्रथम तुमच्यासमोर नतमस्तक होते. आज जिल्ह्याची खासदार म्हणून तुमच्या मागण्या मी पूर्ण करणार आहे. पण मला इथे राजकारणाचं बोलायचं नाही, तुम्ही मला खूप दिलंय आणि यापुढेही द्याल, मी आज तुमची क्षमा मागणार आहे. कारण आज माझ्या खासदारकीला नऊ वर्षे पूर्ण झाले आणि एवढ्या वर्षानंतर मी तुमच्या गावात आले यासाठी मी तुमची माफी मागत आहे." असं मुंडे म्हणाल्या.

"मला नेहमी वाटतं, दिवसभर काम केल्यानंतर ज्यावेळी झोपायला जाते त्यावेळी मनामध्ये असायला पाहिजे की आज मुंडे साहेबांच्या लेकीसारखं आपलं काम झालं. मला कोणतीच अपेक्षा नाहीये, माझं शेवटपर्यंत काम असं असेल की, तुम्ही तुमच्या मनातून म्हणाले पाहिजेत की, व्वा... आज मुंडे साहेबांची लेक शोभतेय. आज साहेबांच्या आठवणीत आणि तुमच्या प्रेमात मी भावूक झाले आहे." असं म्हणत त्या भर कार्यक्रमात भावूक झाल्या.

"ज्या गावकऱ्यांनी माझा चेहरासुद्धा प्रत्यक्षात बघितला नाही पण दोनदा निवडून दिलं त्या गावकऱ्यांच्या आज मी भेटीला आले. या गावकऱ्यांच्या भेटीला येईन असा शब्द साहेबांनी दिला होता पण तो शब्द मी पूर्ण केल्याचं मला समाधान आहे." असंही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT