PSI training Nashik DEV
मराठवाडा

PSI होण्याचे स्वप्न अधुरे, विद्यार्थ्याचा हृदयविकाराने निधन

सकाळ डिजिटल टीम

जालना : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले आहे. मृताचे अशोक सोनाजी घुले (वय ३०, रा.आंबा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना जालना (Jalna) जिल्ह्यातील आंबा येथे बुधवारी (ता.चार) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. अशोकचे पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) (Police Sub Inspector) व्हायचे स्वप्न होते. मात्र हे स्वप्न त्याचे वास्तवात येण्यापूर्वीचे तो जग सोडून निघून गेला आहे. आंबाचे सोनाजी घुले यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांना शेत आहे. दोन मुलांपैकी अशोक हा गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद येथे एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत होता.

काही दिवसांवर परीक्षा आली होती. मात्र गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षीही परीक्षा रद्द होईल का? याची चिंता अशोकला लागली होती. तो काही दिवसांपूर्वीच आंबा या आपल्या गावी आला होता. बुधवारी वडिलांना मदतीसाठी अशोक शेतात गेला होता. दुपारी त्याला छातीत वेदना होऊ लागल्या. तो एका झाडा खाली बसला असता त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Wari: गुरुवारी दोन्ही पालख्या पुण्यात! वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; 'हे' रस्ते असतील बंद

Low Cost Loan: लोन पाहिजे? मग PPF खात्यावर मिळवा स्वस्तात कर्ज! किती रक्कम मिळते? व्याजदर किती? जाणून घ्या संपूर्ण नियम

Latest Marathi News Update : पुण्यात मोठे ट्रॅफिक बदल; पालखी सोहळ्यामुळे निर्णय

Building Collapsed: चिमुरड्याने रोखली मोठी जीवितहानी, मानखुर्द दुर्घटनेप्रकरणी मालकासह दोघांना अटक; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कमळीचा मॉडर्न अवतार पाहिलात का? अभिनेत्री विजया बाबरने शेअर केला हटके व्हिडिओ, मरीन ड्राईव्हवर वनपीस घालून...

SCROLL FOR NEXT