Mudra-Loan
Mudra-Loan 
मराठवाडा

पीककर्जाऐवजी दिले साडेसात लाखांचे मुद्रा कर्ज

सकाळवृत्तसेवा

पाटोदा (जि. बीड) - मुद्रा लोन योजनेंतर्गत ऊसतोड मजुराच्या नावावर तब्बल साडेसात लाखांचे कर्ज जमा झाले असून, ही रक्कम गेल्या वर्षी जमा झाल्याचा दावा बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी केल्याने मजूर दांपत्याला मानसिक धक्का बसून रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली आहे.

हा प्रकार किसन मारुती गोंदकर (रा. चुंबळी, जि. बीड) यांच्याबाबत घडला. विशेष म्हणजे गोंदकर यांना ही योजना काय आहे, हेही माहिती नाही. बॅंक अधिकारीही कानावर हात ठेवून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. किसन गोंदकर यांनी काही दिवसांपूर्वी पीककर्जासाठी पाटोदा येथील एसबीआय शाखेत अर्ज केला होता. ते मागील आठवड्यात या कामानिमित्त बॅंकेत गेले असता तेथील अधिकाऱ्यांनी तुमच्या नावावर मुद्रा कर्जाचे साडेसात लाख रुपये कर्ज असून, ही रक्कम 24 नोव्हेंबर 2017 रोजी तुमच्या खात्यावर जमा केली असल्याचे सांगितले. हे ऐकताच गोंदकर यांना मानसिक धक्का बसला. त्यांच्या दाव्यानुसार त्यांनी मुद्रा कर्ज योजनेबाबत ना कधी ऐकले आहे ना कधी याबाबत कोणत्याही बॅंकेत अर्जही केलेला नाही; तरीही आपल्या नावावर एवढे मोठे कर्ज कसे काय पडले?

यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आठ दिवसांपासून ते दररोज बॅंकेचे खेटे घालत आहेत; मात्र कुठलीही ठोस माहिती बॅंकेच्या अधिकाऱ्यांनीही दिली नाही. केवळ "चौकशी करू' असे उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. यामुळे किसन यांच्या पत्नीलाही मोठा मानसिक धक्का बसला असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

तीन दिवसांत या प्रकरणाची सखोल चौकशी करून ऊसतोड कामगाराला तत्काळ न्याय मिळावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
- गोरख झेंड, सामाजिक कार्यकर्ते

बॅंकेने यासंदर्भात जी कागदपत्रे आपल्याला दाखविली आहेत, त्यात आधार व मोबाईल क्रमांक आपलाच आहे; परंतु पॅनकार्डचा क्रमांक दुसराच आहे. माझ्या नावावर कुणीतरी खोटेपणा केल्याची शक्‍यता आहे.
- किसन गोंदकर, ऊसतोड कामगार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT