file photo
file photo 
मराठवाडा

परभणीचा मुकूल विटेकर राज्यात प्रथम

गणेश पांडे

परभणी ः परभणी सारख्या ग्रामीण भागात वास्तव्यास असूनही स्वताच्या कर्तूत्वावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कक्ष अधिकारी संवर्गातून राज्यात प्रथम येण्याचा मान परभणीतील तरूण मुकूल मुकूंदराव विटेकर यांने पटकाविला आहे. अत्यंत साधारण परिस्थितीतून शिक्षण घेत मुकूल विटेकर याने वयाच्या २४ व्यावर्षीच मिळविलेल्या दैदिप्यमान यशाचे जिल्ह्यातून कौतूक होत आहे.
परभणी शहरातील मुकूल मुकूंदराव विटेकर या तरूणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. राज्य सेवा (पूर्व) परीक्षा २०१९ ही ता. १७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईसह अन्य ३६ केंद्रावर घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यातून ३ लाख ६० हजार ९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेतून ६ हजार ८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. मुख्य परीक्षा ता. १३ ते १५ जुलै २०१९ रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथे घेण्यात आली. त्याचा निकाल शुक्रवारी (ता.१९) जाहीर झाला. या परीक्षेत परभणीतील रहिवाशी मुकूल मुकूंदराव विटेकर हा तरूण कक्ष अधिकारी संवर्गातून राज्यात प्रथम आला आहे.
मुकूल मुकूंद विटेकर याचे शिक्षण नवोदय विद्यालय परभणी येथे झाले. इयत्ता १२ नंतर त्याने विद्या प्रतिष्ठाण बारामती येथून मॅकेनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. परंतू अभियांत्रिकीचे शिक्षण घेवूनही त्याला स्पर्धा परीक्षांची ओढ होती. त्यामुळे त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी येथे सलग दोन वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी पूर्ण केली. त्या ठिकाणी डॉ. विवेक कुलकर्णी व सविता कुलकर्णी यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.

आमदार बाबाजानी दुर्राणी परिवाराकडून कौतूक
परभणीतील विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी याचे स्विय सहाय्यक म्हणून मुकूंदराव विटेकर हे काम पाहतात. त्यामुळे मुकूलच्या यशाचा आनंद आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी देखील साजरा केला. त्यांनी मुकूल विटेकर यास घरी बोलावून त्याचा दुर्राणी परिवारांच्यावतीने यथोचित सत्कार केला. यावेळी शाहिस्ताबेगम दुर्राणी, मुकूंदराव विटेकर यांच्यासह इतर उपस्थित होते.

 अभ्यासाचे नियोजन
आई- वडीलांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन कायमच होते. त्याच बरोबर ज्ञानप्रबोधिनी पुणे चे डॉ. विवेक कुलकर्णी व सविता कुलकर्णी यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. स्पर्धा परीक्षेतूनच करिअर करायचे हे अधिपासूनच ठरविले होते. अभ्यासाचे नियोजन  केले होते. दिवसातील ठराविक तास अभ्यास पूर्ण केला.
- मुकूल मुकूंदराव विटेकर, कक्ष अधिकारी, मंत्रालय, मुंबई

मुलाच्या यशाचा सर्वात मोठा आनंद
मुकूलला स्वता केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. वडील म्हणून मी फक्त भौतिक सुविधा देऊ शकलो. परंतू खरे तर ज्ञानप्रबोधिनीचे मार्गदर्शन व मुकूलची जिद्द हे कामाला आले. आज तो कक्ष अधिकारी म्हणून राज्यात प्रथम आल्याचा सर्वात मोठा आनंद आहे.
- मुकूंदराव विटेकर, पालक.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT